esakal | पाटण : युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; पाटणकरांसह जगदीश पाटलांची वर्णी I Political
sakal

बोलून बातमी शोधा

Patan Taluka

पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची नूतन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आलीय.

पाटण : युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची (Patan Taluka Youth Congress Committee) नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर (President Narendra Patankar) तर उपाध्यक्षपदी जगदीश पाटील आणि उदयसिंह चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

श्री. पाटणकर हे दिवशी बुद्रक, श्री. पाटील हे सुपने, तर श्री. चव्हाण हे कुंभारगावचे राहणारे आहेत. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, निरंजन धस, सुभाष माने, रोहित चव्हाण, योगेश काकडे, मारुती शेलार. सदस्य- परशुराम पवार, रमेश शेलार, रमेश साळुंखे, जमीर डांगे, रोहित माने, विनोद घाडगे, सचिन साळुंखे, जयदीप कदम, तुषार कांबळे, अक्षय सुतार, प्रशांत पालकर. निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लसोत्‍सवातून राजकीय 'डोस'

हिंदुराव पाटील म्हणाले, ‘‘मध्यंतरीच्या बदलत्या राजकीय परिस्थितीतही पाटण तालुक्यात काँग्रेस पक्षाने वर्चस्व कायम ठेवले आहे. काँग्रेसची विचारधारा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंबीर साथ व त्यांच्या माध्यमातून झालेला भरीव विकास यामुळेच हे शक्य झालेले आहे. नूतन पदाधिकारी काँग्रेसच्या विचारधारेत घडलेले असून, त्यांनी पक्ष बळकटीसाठी आणखी चांगले योगदान द्यावे.’’

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काका-पृथ्वीराजबाबांना मानणारा गट एकत्र

loading image
go to top