माणमध्ये 17 जागांसाठी दोन अपक्षांसह 53 उमेदवार रिंगणात

माण बाजार समितीत तीन पॅनेलमध्ये सत्तासंघर्ष
Voting
Votingesakal

दहिवडी (सातारा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Maan Taluka Agricultural Market committee) जोरदार घमासान सुरू आहे. प्रमुख व प्रबळ तीन पॅनेलमधील जबरदस्त सत्तासंघर्ष शिगेला पोचला आहे. 28 जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत 17 जागांसाठी दोन अपक्षांसह 53 उमेदवार रिंगणात आहेत. आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party)-राष्ट्रीय समाज पक्ष युतीचे शेतकरी सहकार पॅनेल, प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-काँग्रेस-अनिल देसाई गट यांचे माण विकास आघाडी पॅनेल व शेखर गोरे पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनेल यांचे प्रत्येकी 17 उमेदवार आहेत. प्रचार शिगेला पोचलेला होता. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे नेते, उमेदवार व समर्थकांची जराही उसंत न घेता धावपळ सुरू होती.

Summary

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Maan Taluka Agricultural Market) जोरदार घमासान सुरू आहे.

ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघात शेतकरी सहकार आणि माण विकास आघाडीत मोठी चुरस आहे. तर सतरापैकी अकरा संचालक निवडून येणार असलेल्या सोसायटी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात आपली मोठी ताकद असल्याचा दावा परिवर्तन विकास पॅनेलकडून करण्यात येत आहे. शेखर गोरे यांनी यांनी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, शेखर गोरे, मनोज पोळ, अरुण गोरे, बबनराव वीरकर, मामूशेठ वीरकर आदी मातब्बर नेतेमंडळींनी उमेदवारांना सोबत घेऊन पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. वैयक्तिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न केला आहे.

Voting
लाच प्रकरणी मंत्री तनपुरेंचा अ‍ॅक्शन मोड

सध्या तोट्यात असलेली बाजार समिती फायद्यात आणून शेतकऱ्यांचे हित व विकास जपणार असल्याचा जाहीरनामा सर्वांनी प्रसिध्द केला आहे आणि आमचाच पॅनेल बाजार समितीचा विकास करून तिला फायद्यात आणेल हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच उद्या (ता. सहा) रात्रीपर्यंत प्रत्येकाकडून विरोधकांचे मतदान फोडण्यासाठी व आपले हक्काचे मतदान ताब्यात ठेवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले जाणार आहेत. साम, दाम, दंड ही नीती सर्वांकडून वापरण्यात येत आहे. मतदारांकडून पक्षनिष्ठेला (पॅनेल निष्ठेला), वैयक्तिक हितसंबंधांना, भाऊबंदकीला महत्त्‍व दिले जाणार की, या सर्वांवर लक्ष्मी दर्शन मात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Voting
कऱ्हाड पालिकेत पुन्हा राजकारण पेटले; नगराध्यक्षा-सीओंत 'लेटरबॉम्ब'

रविवारी मतमोजणी

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १७ जागांसाठी शनिवार (ता. सात) सकाळी आठ वाजलेपासून दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. सोसायटी मतदारसंघात ८९५, ग्रामपंचायत मतदारसंघात ८३५, तर व्यापारी मतदारसंघात ३३४ मतदार आहेत. दहिवडी, मलवडी, मार्डी व म्हसवड या ठिकाणी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदान होणार आहे. तर आडते/व्यापारी मतदारसंघातील मतदान दहिवडीत होणार आहे. मतमोजणी रविवार (ता. आठ) सकाळी आठ वाजलेपासून बाजार समितीच्या सभागृहात सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com