esakal | कऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

कऱ्हाडात कोरोना लसीवरुन 'राजकारण'; नगरसेवक पोस्टरबाजीत गर्क

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात औषधोपचारासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे उभारण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, या सुविधा आम्ही वॉर्डात कशा राबविल्या, या पोस्टरबाजीत नगरसवेक गर्क आहेत. मात्र, पोस्टरबाजीत गर्क असलेल्या या नगरसेवकांबद्दल अत्यंत संताप व्यक्त होत आहे. वेळ, काळ न पाहता कऱ्हाडचे नगरसवेक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही करतील, हेच यातून सिद्ध होत आहे.

शासनाने कोरोनाचे लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र, या लसीकरणासह तेथे सुविधा दिल्याचे श्रेय लाटण्याचा वाद नगरसेवकांत लागलेला आहे. वर्षाअखेरीस पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने श्रेयवादाचे पेव फुटले आहे. त्यामुळे कोविड लसीकरणालाही नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी राजकीय आखाडा केला आहे. श्रेयवादाचा नगरसेवकांचा हा फंडा नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. पोस्टरबाजीतून वाढलेली राजकीय तेढ अडचणीची ठरल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात लागलेले लसीकरणाचे फ्लेक्‍स काढण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी फ्लेक्‍स गायब झाले आहेत, काही फ्लेक्‍स अद्याप झळकताहेत. ते निघतीलही. मात्र, सोशल मीडियावर आज लसीकरण केंद्राच्या श्रेयवादाची नगरसेवकांसह समर्थकांत शाब्दिक जंग सुरू आहे. सोशल मीडियावर नगरसवेक, आघाड्यांच्या समर्थकांत श्रेयवादाचे जणू फुटलेले धुमारे राजकीय असल्याने प्रत्येक जण बाजू मांडताना दिसतो आहे.

ऑक्‍सिजनसाठी 'महावितरण'चा आधार, 'नायट्रोक्‍सिजन'ला दिला वाढीव वीज भार

शहरात कोविडची स्थिती कठीण आहे, त्याच्याशी सामना करण्यासाठी पालिका धडपडत आहे. प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. सध्या पाच केंद्रे आहेत. लशीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने पुढच्या टप्प्याचे नियोजन मागे ठेवले आहे. स्थिती बिकट असतानाच पालिकेतील गटनेत्यांसह ज्येष्ठ नगरसेवक, आघाड्यांचे नेते लसीकरणाच्या राजकीय शो करण्यात मग्न आहेत. लसीकरणाची सुविधा नागरिकांनी आम्हीच पुरविल्याची आवई देणारे फ्लेक्‍स लावण्याचा धडाका सुरू आहे. एकाने लावल्याने दुसरा त्यात उडी घेतो आहे. त्यामुळे त्या सगळ्यात कोविडचे काम करणाऱ्यांना मारक ठरत आहेत. तरीही त्याचे राजकारण करणाऱ्या नगरसवेकांना त्याचा काहीही फरक पडलेला दिसत नाही. नागरिकांच्या भावना मात्र त्या विरोधात तीव्र आहेत. त्यामुळे लसीकरणाचे होणारे राजकारण थांबवण्याची गरज आहे.

चिंताजनक! साताऱ्यात सहा तालुके कोरोनाच्या विळख्यात; जिल्ह्यात अनेक गावं 'हॉटस्पॉट'

शहरात पालिकेने लसीकरण केंद्रे सुरू केली. मात्र, त्यात फ्लेक्‍स लावण्यावरून श्रेयवाद वाढला. त्यात राजकारण होणार असल्याचे दिसल्याने ते सगळे फ्लेक्‍स काढून टाकण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप व फ्लेक्‍सबाजीचे राजकारण थांबले आहे.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Edited By : Balkrishna Madhale