Democracy in Action: Satara District Ensures Smooth Voting with Drone Watch

Democracy in Action: Satara District Ensures Smooth Voting with Drone Watch

Sakal

Satara Elections: गावागावांत मतदानाचा उत्सव! सातारा जिल्ह्यात २८७७ मतदान केंद्रांवर सोय; १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ड्रोनद्वारे वॉच

Deployment of 13,000 Election staff in Satara: सातारा जिल्ह्यात मतदानाची जय्यत तयारी; २८७७ केंद्रांवर ड्रोनद्वारे सुरक्षा
Published on

सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील २८७७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १३ हजार ०९७ शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला गटासाठी एक व गणासाठी एक अशी दोन मते देता येणार आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, आज नेमून दिलेल्या ठिकाणी शासकीय कर्मचारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी रवाना झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com