Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी

अश्वांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेमुळे घोड्यांची पैदास आणि त्यांच्या शर्यती यांना तेथे मोठ्या व्यवसायाचे स्वरूप आलेले आहे. शर्यतीचे मैदान केवळ करमणुकीचे व खेळाचे ठिकाण नसते. 

Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी

सातारा : आजची युवा पिढी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवताना दिसत आहे. संगीत, नाट्य, क्रीडा, गिर्यारोहण, शाहिरी, नृत्य व हॉर्स रायडिंग यांसारख्या अनेक प्रकारांमध्ये युवक-युवती आपले कौशल्य दाखवीत आहेत. त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. काही जणांनी शहराचे नाव साता समुद्रापार कोरले आहे. सातारचा प्रद्युम्न प्रशांत धुमाळ त्यातीलच एक! 

प्रद्युम्नने आयर्लंड येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय इव्हेंटिंग हाॅर्स राइडिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत आयर्लंड, इंग्लंड, इटली व हाॅलंड या देशातील दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नाेंदविला होता. या स्पर्धेत त्याने ड्रेससाज व क्राॅस कंट्री प्रकारात सहावा, तर शो-जम्पिंग प्रकारात तेरावा क्रमांक पटकावला.

मिलिटरी अपशिंगे, पुस्तकांचं भिलार माहितीच असेल, मग जाणून घ्या टॅक्सीचं गाव

मूळचा सातारा जिल्ह्यातील प्रद्युम्न धुमाळ हा एक भारतीय अॅथेलिटक स्पर्धक आहे, ज्याने वयाच्या १२ व्या वर्षीच घोडे सवारी करण्यास सुरवात केली. प्रारंभी त्याच्या वडिलांनी त्यास `पोनी कल्याण` नावाचे अश्व भेट म्हणून दिले. त्यानंतर प्रद्युम्नने आपल्या राइडिंग कारकिर्दीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यासाठी सातवीतच शाळा सोडली. लहानपणीच घोडे सवारीचे बाळकडू लाभल्याने पटकन त्याने घोडे सवारी आत्मसात केली आणि बर्‍याच राइडिंग क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत शो-जम्पिंग, ड्रेसेज स्पर्धा यात त्याने अनेक स्पर्धांवर विजयी मोहोर उमटवली आणि त्याने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. अनेक स्पर्धांत तो अजिंक्य राहिला.

फेसबुक पडलं तोंडावर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या

प्रद्युम्नची ही प्रतिभा निवडकर्त्यांना भावली. तद्नंतर ऑलिम्पिक स्पर्धेत तयारी करुन घेणारे परदेशी प्रशिक्षकांनी त्याची प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी निवड केली. प्रद्युम्नच्या प्रवासात हा एक महाकाव्य बदल होता, कारण जगभरातील अव्वल प्रशिक्षकांनी त्याला प्रशिक्षण दिले, ज्यामुळे त्याचे कौशल्य खूपच सुधारले.

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा 

त्यानंतर प्रद्युम्नने मोठी जोखीम उठवत वेगवान प्रगती केली. दिल्ली येथील हॉर्स शो-२०१८ या तीन दिवसांच्या स्पर्धेत वैयक्तिक कांस्य आणि सांघिक रौप्यपदक जिंकून यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली. त्याचवर्षी  कोलकाता येथील ज्युनियर नॅशनल इक्वेस्ट्रियन चँपियनशिप स्पर्धेवरही आपला ठसा उमटवला. प्रद्युम्नचा अश्व नरनिया आणि प्रद्युम्न आता संपूर्ण देशात प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. या संघाला आता काेणीही थांबवू शकणार नाही अशी त्यांची ओळख निर्माण झाली. गेल्या वर्षी प्रद्युम्न आपल्या 'नरनिया' आणि 'हग्स अँड किसेस' हे अश्व घेऊन बंगळूरला गेला. तिथे ड्रेसेज वर्ल्ड चॅलेंज, इक्वेस्टेरियन प्रीमियर लीग आणि कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धांमध्ये विजय मिळवून स्वत:ला सिद्ध केले. प्रद्युम्नने सध्या आंतरराष्ट्रीय, आशियाई चँपियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि सन २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

प्रद्युम्न सध्या आयर्लंडमध्ये असून त्याला कलेन इक्वाईन सोल्यूशनचे अव्वल प्रशिक्षक 'डेकलान कुलेन' आणि 'बेकी कुलेन' यांच्याकडून प्रशिक्षण देत आहेत. प्रद्युम्न हा एक प्रतिभावान खेळाडू असून तो आधीपासूनच भारतातील हाय प्रोफाइल रायडर म्हणून गणला जातो. आजवर केलेल्या कामगिरीत आयर्लंड येथील प्रद्युमनची कामगिरी उल्लेखनीय मानली जात आहे.

खॉंजामिया फकीरची फिनिक्‍स भरारी, झोपडीतील अभ्यासातून मिळवले दहावीत 85 टक्के गुण 

जर आपल्याकडे ध्येय निश्चित असेल, तर आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्याला यश प्राप्त करता येतं; पण त्यासाठी सतत प्रयत्न असायला पाहिजेत. कोणत्याही कामगिरीकडे लक्ष केंद्रीत केली की, आपोआप निश्चित यशाला गवसणी घालू शकतो, अन्यथा नाही. तसेच कोणत्याही स्पर्धेत आवाहन टिकवायचं असेल तर मेहनत आवश्यक आहे. त्यासाठी सर्वार्थाने तयार असायला हवे, असे मी मानतो.

- प्रद्युम्न धुमाळ, हाॅर्स रायडरशर्यतीचे मैदान केवळ करमणुकीचे ठिकाण नसते 

अश्वांच्या शर्यती जगभर रूढ असल्या, तरी इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांत त्या विशेष लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेमुळे अश्वांची पैदास आणि त्यांच्या शर्यती यांना तेथे मोठ्या व्यवसायाचे स्वरूप आलेले आहे. शर्यतीचे मैदान केवळ करमणुकीचे व खेळाचे ठिकाण नसते. अश्वांची चाचणी घेण्याचे, त्यांची शक्ती अजमाविण्याचे व शारीरिक कणखरपणा जोखण्याचेही स्थान असते. चाचणीत उतरलेल्या घोड्यांच्या खरेदी-विक्रीचा फार मोठा व्यवहारही तेथे होतो. इंग्लंडमध्ये घोड्यांच्या शर्यतीची लोकप्रियता वाढल्यामुळे तेथे एका मध्यवर्ती अधिकारी मंडळाची स्थापना करून, तसेच शर्यतीचे नियम व अटी तयार करून त्या शर्यती अपप्रकार न होता चांगल्या रीतीने पार पडतील, याची दक्षता घ्यावी लागली. १७५१ साली स्थापन झालेल्या जॉकीक्लबमध्ये अनेक मोठ्या आणि सरदार मंडळींचा समावेश होता. नॅशनल हंट समिती ही त्याच क्लबची संलग्न संस्था असून, तिची आजही तेथील शर्यतींवर कडक नजर असते. पोनी टर्फ क्लब नव्याने स्थापन झालेला असून त्याच्या नियमांप्रमाणे १५ हातांपेक्षा (सु. १५० सेंमी.) मोठी घोडी चालत नाहीत. या संस्थांच्या नियमांच्या बाहेर ज्या शर्यती होतात, त्यांना फ्लॅपिंग शर्यती असे म्हणतात. या शर्यतीत भाग घेतलेल्या अश्वांना या तीन संस्थांनी चालविलेल्या शर्यतीत भाग घेता येत नाही.

ब्रिटिश बेटांतील सपाट मैदानावरील शर्यतीची जबाबदारी जॉकीक्लबची आहे. नॅशनल हंट समिती आडदांडी (हर्डल्स) व कुंपणांतील (फेन्स) शर्यती घेते. आयरिश टर्फ क्लब आणि आयरिश नॅशनल हंट स्टीपल चेस या समित्यांकडे आयर्लंडमधील शर्यतींचे अधिकार आहेत. ब्रिटनमधील शर्यती अत्यंत शिस्तीने चालतात. येथे स्ट्युअर्डच्या निर्णयावर दादही मागता येत नाही. 

अश्वांच्या शर्यतीत त्यांच्या वयावरून गट - शर्यतींच्या विविध प्रकारांत भाग घेणाऱ्या अश्वांची  आनुवंशिकता, त्यांचे वय आणि त्यांनी वाहून न्यावयाचे वजन तसेच त्यांनी शर्यतीत काटावयाचे अंतर आदी गोष्टी नियमांनुसार निश्चित केलेल्या असतात. अश्वांच्या शर्यतीत त्यांच्या वयावरून गट पाडतात. २ ते ५ वर्षांच्या अश्वांला शिंगरू म्हणतात व घोडीला शिंगी म्हणतात. दोन वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत अश्व किंवा घोडी दुय्यम दर्जाच्या शर्यतीत भाग घेऊ शकतात. पाच वर्षांनंतर ते प्रथम दर्जाच्या (क्लासिकल) शर्यतीत भाग घेण्यास पात्र होतात. पाच वर्षांच्या घोड्याची उंची १५ ते १६ हात म्हणजे १५० ते १६० सेंमी. असते व वजन सु. ४१० ते ५४५ किग्रॅ.च्या (९०० ते १,२०० पौंड) दरम्यान असते. 

आम्ही राजकीय पक्ष, विचार बघत नाही; फेसबुककडून आलं स्पष्टीकरण

अश्वांच्या शर्यती विषयी थाडेसे....

मुंबईत भायखळा क्लबच्या मैदानावर १७९७ सालापासून शर्यतींना सुरुवात झाली. महालक्ष्मीच्या मैदानावरील शर्यती १८८३ सालापासून चालू झाल्या. १९२५ साली हा क्लब खाजगी मर्यादित कंपनी म्हणून नोंदण्यात आला. शर्यतीच्या वेळी घोडा किती वजन वाहून नेऊ शकेल, हे ठरविण्याची जबाबदारी त्या घोड्याच्या शिक्षकावर असते. हा अधिकार शिक्षक दुसऱ्यालाही देऊ शकतो. हे वजन शर्यतीपूर्वी विशिष्ट वेळी जाहीर करावे लागते. या जाहीर केलेल्या वजनांची चाचणी घ्यावयाची जबाबदारी वजन घेणाऱ्या कारकुनावर असते. वजनात जॉकी, खोगीर, झापडी इत्यादींचेही वजन धरतात. जर जॉकीचे वजन जाहीर केलेल्या वजनापेक्षा जास्त भरत असेल, तर ही वाढ शर्यतीपूर्वीच प्रकट करण्यात येते. या जादा वजनामुळे तो घोडा शर्यत जिंकण्याचा संभव कमी होत असला, तरी मालकाला आणि शिक्षकाला तोच जॉकी हवा असेल, तर ही वाढ क्षम्य समजतात. शर्यतीपूर्वी भरलेल्या वजनाइतकेच शर्यतीनंतरही वजन भरले पाहिजे, असा निर्बंध असल्याने शर्यत संपल्यानंतर पाच मिनिटांच्या आत विजयी घोड्यांची वजने घेतात. दुसऱ्या घोड्याला स्पर्श करणे, त्याच्या मार्गात येणे किंवा त्याला मैदानाबाहेर ढकलणे, घोड्याला पुष्कळ मारपीट करणे किंवा ओरडणे, उत्तेजक किंवा मादक पेय किंवा औषधे देणे इ. नियमबाह्य व दंडनीय अपराध असून अशा घोड्याला शर्यतीत भाग घ्यावयास बंदीही करता येते. या खेळात ज्ञान, अनुभव, धाडस या गोष्टींप्रमाणेच दैवही अनुकूल असावे लागते. शेरगर हा ७५ ते ८० च्या काळातील युरोपमधील सगळ्यात प्रसिद्ध घोडा होता. युरोपात होणाऱ्या घोड्यांच्या रेसमध्ये त्याचे निर्विवाद वर्चस्व होते. शेरगरचा जन्म १९७८ साली आयर्लंडमध्ये झाला. त्याचे मालक आगाखान (चतुर्थ ) हे होते जे निझारी मुस्लिमांचे नेते आणि एक श्रीमंत व्यक्तिमत्व होते. रेसिंग जगतातील अभ्यासकांनी त्याला सर्वोत्कृष्ट घोड्याची पदवी दिली.

Edited By : Siddharth Latkar