
आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घ्यायचंच आणि तेही ओबीसीमधूनच (OBC Reservation) असा नारा देत पुनःश्च एकदा हरिओम म्हणत सुरुवात करायची, असा एकमुखानं निर्णय घेण्यात आला.
फलटण शहर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं पावलं उचलावीत, तसंच आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून संपूर्ण राज्यात नव्या जोमानं समाज एकवटावा, यासाठी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यानं सुरुवात करावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गदर्शक यांनी इथं बैठक आयोजिली होती.
यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घ्यायचंच आणि तेही ओबीसीमधूनच (OBC Reservation) असा नारा देत पुनःश्च एकदा हरिओम म्हणत सुरुवात करायची, असा एकमुखानं निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) फलटण तालुक्यातील (Phaltan Taluka) सर्व मराठा समाजातील असलेले समन्वयक यांची बैठक जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक विवेक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील प्रमुख समन्वयक उपस्थित होते. या वेळी सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर पुणे, सातारा जिल्ह्यांतील प्रमुख मार्गदर्शक यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या 28 जानेवारीला 11 तालुक्यांतील सर्व समन्वयक व मार्गदर्शक यांची बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वानुमते पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज पुन्हा एकवटून आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी लागेल, जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत, त्यांना सोडून हा लढा पुढे न्यायचा असल्याने आता मतभेद बाजूला सारून न्यायालयीन लढ्याबरोबरच रस्त्यावरील लढ्याला सज्ज राहण्याची तयारी दर्शविली आहे. या वेळी फलटण तालुक्यातील समन्वयक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.