राष्ट्रपतींच्या गिफ्टने खासदार श्रीनिवास पाटील गेले भारावून

सचिन शिंदे
Wednesday, 27 January 2021

सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध दृढ करून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असे शुभेच्छा पत्रात राज्यपालांनी नमूद केले आहे.

क-हाड : मला राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी (Ram Nath Kovind) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) पाठवलेले शुभेच्छा पत्र व भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देण्यात आले. सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांनी केलेल्या या सन्मानाने मी भारावून गेलो आहे अशा शब्दांत खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी भावना व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सिक्कीम माजी राज्यपाल व साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी पत्राद्वारे या शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा खासदर पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना उत्तम आरोग्यासाठी व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तुमच्या मदतीशिवाय तीरा तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी

राष्ट्रपती भवनाकडून कऱ्हाडच्या तहसिलदारांना शासकीय कार्यक्रमात पत्र व राजदंडक प्रदान करण्याचे आदेश आले होते. त्यानुसार कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकिय ध्वजारोहण समारंभात प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र व राजदंडक प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार पाटील यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांचे संवैधानिक कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. तसेच सिक्कीम राज्यातील लोकांची सेवा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्राधान्य दिले. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध दृढ करून आपली संघराज्य रचना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आपले अमूल्य योगदान यशस्वीरित्या देऊन आपण आपल्या पदापासून मुक्त झालात. ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. व्यक्तिमत्त्व, कृतज्ञता आणि विपुल अनुभवांनी समृद्ध असलेले तुम्ही नेहमीच समाज आणि देशासाठी प्रेरणेचे स्त्रोत राहाल. तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छांसह भारतीय प्रजासत्ताकचे सुसज्जित दंडक स्मृतिचिन्हाच्या रूपाने मी आपणास भेट देत आहे. दरम्यान राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन प्रजासत्ताक दिनी केलेल्या या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करीत महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आभार मानले आहेत.

आज मला राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाठवलेले शुभेच्छा पत्र व भारतीय राजमुद्रेने सुशोभित...

Posted by Shriniwas Patil on Tuesday, January 26, 2021

शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

Edited By : Siddharth Latkar

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ram Nath Kovind Sends Gift To MP Shriniwas Patil On Republic Day Satara Marathi News