esakal | साताऱ्यात कोरोनाची तीव्र लाट; लिंबात पाच दिवसांचा कडक कर्फ्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Public Curfew

साताऱ्यात कोरोनाची तीव्र लाट; लिंबात पाच दिवसांचा कडक कर्फ्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सायगाव (सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लिंब येथे उद्यापासून 8 मेअखेर पाच दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लिंब परिसरात बाधितांची संख्या वाढत चालली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा दृष्टीने लिंबमध्ये 4 मे ते 8 मेअखेर जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय गाव कृती समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

या दरम्यान संपूर्ण बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या जनता कर्फ्यूच्या कालावधीत कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर प्रशासनाच्या मार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच ऍड. अनिल सोनमळे यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून मृ्त्यूचेही प्रमाण तितकेच वाढले आहे, त्यामुळे नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून देखील योग्यती खबरदारी घेतली जात असून रुग्णांपर्यंत उपाययोजना पोहोचवल्या जात आहेत.

दुधेबावीची महालक्ष्मी यात्रा रद्द; पंचायतीच्या बैठकीत ग्रामस्थांचा महत्वपूर्ण निर्णय

अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी

Edited By : Balkrishna Madhale

loading image