Khambatki Ghat : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात तब्बल चार तास वाहतूक खोळंबली; काय आहे कारण?

गुरुवारी रात्री एक वाजता घाटातील सहाव्या वळणावर दत्त मंदिराजवळ एक ट्रक बंद पडला.
Khambatki Ghat
Khambatki Ghatesakal
Summary

महामार्ग व ट्राफिक पोलिसांनी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत बोगदा मार्गे वळविण्यात आली.

खंडाळा : आज (शुक्रवार) सकाळपासून खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक चार तास खोळंबली होती.

Khambatki Ghat
Belgaum : अधिवेशनाच्या तोंडावरच कन्नड संघटनांनी फाडले इंग्रजी-मराठी फलक; नेत्यांचं लक्ष वेधण्यासाठी कन्नडिगांची वळवळ सुरू

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी रात्री एक वाजता घाटातील सहाव्या वळणावर दत्त मंदिराजवळ एक ट्रक बंद पडला. या ठिकाणी दोनच लेन असल्यामुळं व गाड्यांची संख्या रस्त्यावर जास्त असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंड निर्माण झाली.

Khambatki Ghat
Child Sale Racket : तीन वर्षांत तब्बल 250 हून अधिक बालकांची केली विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

त्यावेळी महामार्ग व ट्राफिक पोलिसांनी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत बोगदा मार्गे वळविण्यात आली. यानंतर बंद पडलेला ट्रक बाजूला केल्यामुळे पोलिसांनी सध्या वाहतूक नियंत्रण आणली आहे. दरम्यान, धनगर आरक्षणासाठी आज महामार्ग रोखला जाण्याचीही शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com