esakal | मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही ग्रेड सेपरेटरचे प्रशासकीय संकेतांनुसार उद‌्घाटन करण्यात येणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. आता तारीख आणि वेळ ठरवून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रीही साताऱ्यात उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : येथील ग्रेड सेपरेटरचे (Satara Grade Seprator) काम पूर्ण झाले असून त्याचा वापर सातारकर नागरिकांकडून सुरु झालेला आहे. या ग्रेड सेपरेटरमधून आपण गेल्यास काेठे बाहेर पडणार हे अद्याप सातारकरांच्या देखील अंगवळणी पडलेले नाही. अन्य जिल्ह्यातून देखील येणा-या लाेकांना ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करताना नेमके काेठे जायचे आहे हे लवकर लक्षात येत नसल्याचे चित्र आहे.

सातारा शहरात सुमारे ७५ कोटी रुपये खर्चून ग्रेड सेपरेटर बांधण्यात आलेला आहे. हा ग्रेड सेपरेटर जनतेसाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आठवड्यापुर्वी उदघाटन करुन खूला केला. त्यानंतर सातारकर या ग्रेड सेपरेटरचा वापर करु लागले आहेत. राजपथावरुन आल्यानंतर येथील बगाडे हाॅस्पिटल समाेरुन वाहनधारकांनी ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना केवळ मुख्य बसस्थानकाच्या दिशेने जाता येत आहे. या मार्गावरुन वाहनधारकांना उजव्या बाजूस वळण्यास मनाई आहे. शिवराज पेट्राेलपंपहून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट आॅफ सायन्स काॅलेज रस्त्यावरुन म्हणजे काेल्हापूर, क-हाडकडून येणा-या वाहनधारकांनी केवळ मुख्य बसस्थानकाकडे जाण्यासाठी ग्रेड सेपरेटरचा वापर करावा. ज्या वाहनधारकांना सातारा शहरात जायचे आहे त्यांनी ग्रेड
सेपरेटरमध्ये जाऊ नये. त्यांनी माेनार्क चाैक अथवा पाेवई नाका रस्त्याचा वापर करावा.

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?
 
मुख्य बसस्थानाककडून येणा-या वाहनधारकांना काेल्हापूर अथवा काेरेगावला जायचे आहे त्यांनीच केवळ प्रांतधिकारी कार्यालयाच्या मार्गातून ग्रेड सेपरेटरच्या रस्त्यात प्रवेश करावा. या मार्गातून आत प्रवेश केल्यावर काही अंतरानंतर उजवीकडे आणि डावीकडे असे दाेन मार्ग आहेत. उजवीकडचा मार्ग काेरेगाव रस्त्याच्या दिशेने जाताे. डावीकडचा मार्ग काेल्हापूरच्या दिशेने जाताे. ज्यांना सातारा शहरात जायचे आहे त्यांनी नेहमीच्या रस्त्यावरुनच म्हणजेच पाेवई नाका येथून प्रवास करावा.

राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार

दरम्यान जे पर्यटक पुणे, मुंबई, कोल्हापूर, बारामतीच्या दिशेने मुख्य बसस्थनाक मार्गे कास, ठोसेघर, भांबवली, वासोटाला जाण्यासाठी येत आहेत. त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या रस्त्याचा वापर करू नये याचे कारण म्हणजे मुख्य बसस्थानकाकडून प्रांतकार्यालया मार्गे ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश करणारी वाहने ही सातारा शहराच्या पश्चिम बाजूस जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी पाेवई नाक्याच्या जुन्याच रस्त्यावरुन सातारा शहरात अथवा पर्यटनस्थळी जाण्यासाठी वापर करावा.

उदयनराजेंची देहबोलीने कार्यकर्त्यांत मेहेरबान हाेण्याचे पसरले चैतन्य

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात

loading image