esakal | पावसाने अडवली शेतमालाची वाट;सर्वसामान्‍यांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : पावसाने अडवली शेतमालाची वाट;सर्वसामान्‍यांना फटका

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जिल्‍ह्याच्‍या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्‍याने शेतमालाचा पुरवठा खंडित झाला आहे. गरजेइतका शेतमाल बाजारात येत नसल्‍याने सर्वच शेतमालाचे दर दुपटीने वाढले असून, त्‍याचा फटका सर्वसामान्‍यांना बसत आहे. पावसाचे थैमान सुरूच राहणार असल्‍याचे संकेत असल्‍याने सातारकरांना आणखी काही दिवस चढ्या दरानेच भाजी खरेदी करावी लागणार आहे.

नेहमीप्रमाणे पितृ पंधरवड्यात भाज्‍यांचे दर वाढले होते. हे दर पितृ पंधरवडा संपल्‍यानंतर कमी होतील, असे व्‍यापारी व भाजीविक्रेते सांगत होते. हा पंधरवडा संपून नवरात्र सुरू झाले असतानाच जिल्ह्याच्‍या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्‍यास सुरुवात केली. यामुळे तोडणीसाठी आलेला शेतमाल काढून बाजारात आणण्‍यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाचा जोर कायम असल्‍याने शेतरस्‍ते आणि पाणंद रस्‍ते चिखलाने माखले असून, त्‍यातून शेतमालाची वाहतूक करणारी वाहने आणणे व नेणे शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. शेतकऱ्यांच्‍या या अडचणीमुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील भाज्‍यांच्‍या दरात चारपटीने वाढ झाली आहे. गुरुवारच्‍या बाजारात वांगी विक्रीचा किरकोळ दर १२० रुपये किलोच्‍या घरात होता. याचबरोबर गवारी ८०, पावटा ८० ते १००, भुईमूग शेंगा ८०, भाजी पेंडी २० ते ३०, फ्‍लॉवर ६०, टोमॅटोचा ८० रुपये प्रतिकिलो इतका दर होता. भाज्‍यांच्‍या चढ्या दरामुळे सर्वसामान्‍यांच्‍या खिशावर ताण पडत असून, आणखी काही दिवस हे दर चढेच राहतील, असे व्‍यापारी, भाजीविक्रेते सांगत आहेत.

हेही वाचा: ठाणे : देवी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल

कांदा महागला

अवकाळी पावसाने बहुतांश शेतकऱ्यांच्‍या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्‍यास सुरुवात झाली आहे. पाऊस असल्‍याने तसेच कांदा खराब होत असल्‍याने बाजारातील आवक मंदावली असून, परिणामी किरकोळ बाजारातील कांदा ४० रुपयांच्‍या घरात जावून पोचला आहे.

हेही वाचा: पुणे : 'महाराष्ट्र बंद' आंदोलनामुळे फातिमानगर चौकात वाहतूक कोंडी

फुलबागांचे नुकसान

सततच्‍या पावसामुळे दसरा आणि दिवाळीसाठी फुलबागा केलेल्‍या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्वच फुलबागांमध्‍ये पाणी साठून राहिल्‍याने तोडणी आणि वाहतूक मंदावली असून, त्‍यातच फुलांना करपा व इतर रोगांनी घेरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दसऱ्याच्‍या मुहूर्तावर फुलांचा तोट्यातील धंदा करावा लागण्‍याची शक्‍यता आहे.

loading image
go to top