Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Shetti Seeks Support for Upcoming Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी यांनी कराडमध्ये माजी सहकार मंत्री आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भेट घेत ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची विनंती केली.
Sugarcane Agitation

Sugarcane Agitation

esakal

Updated on: 

कराड : शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली. शासनाने साखर कारखाने 15 ऑक्टोबर पासून चालू करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्यावतीने साखर उद्योगास ऊर्जितावस्था देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याच्या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करून साखर उद्योग, कारखानदारी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने चालू गळीत हंगामात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची विनंती केली.

15 ऑक्टोबर पासून गळीत हंगाम सुरू झाल्यास रिकव्हरीची घट होऊन शेतकरी व कारखाने या दोघांचे नुकसान होणार आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन रुपये 500 अनुदान द्यावे. साखरेचा किमान हमीभाव प्रति किलो 50 रुपये व सी हेवी इथेनॉल प्रति लिटर 70 रुपये विक्री दर निश्चित करावा.

Sugarcane Agitation
Asian Games Athletics : मिश्र रिलेत रौप्य, तर सीमा कुमारीला ब्राँझ ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; ॲथलेटिक्समध्ये पहिल्याच दिवशी भारताला दोन पदके

इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने प्रकल्पांच्या कर्जाच्या हप्त्याचा व व्याजाचा भात कारखान्यावर येणार असल्याने संपूर्ण वर्षभराची व्याज सवलत व हप्त्यास मुदत वाढ योजना जाहीर करावी. येत्या ऊस आंदोलनात अशा विविध मागण्यांसंदर्भाचे शासनाकडे सादर करावयाच्या निवेदनाची प्रत व आंदोलनात सहकार्य करण्याचे विनंती पत्र मा.खासदार श्री राजू शेट्टी यांनी माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सादर केले.

माजी मंत्री श्री. पाटील यांनी श्री शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वावाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड उत्तर तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
Shaktipeeth Highway Protest raju shetti
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Raju Shetti Demands Shriram Sugar Factory Restart Questions Support For Private Sugar Mills And Warns Government Of Protest
Marathi News Esakal
www.esakal.com