वडूज: चालू हंगामात उसाच्या उत्पादनात घट होणार आहे, साखर कारखानदार तुमच्या मागे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसतोडीची गडबड करू नये, अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे पाहणार नाहीत. या गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटना उच्चांकी दर मिळवून देईल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.