

Raju Shetti Issues Warning Over Sugarcane Rates Says No Sugar Mill Should Start Before November In Maharashtra
sakal
उंब्रज : शासनाने ठरवून दिलेल्या १५ ऑक्टोबरपूर्वी कारखाने सुरू करण्याचा घाट कारखानदारांनी घातला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक ही साखर कारखाना नोव्हेंबरपूर्वी चालू होऊ द्यायचा नाही, ऊसदरासाठी पुन्हा पुन्हा येणार, वेळप्रसंगी रस्त्यावर गाड्या अडवणार, त्यामुळे ‘रोक सको तो रोक लो’ असे सांगून, धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.