उद्योगपतींसाठीच मोदी सरकारनं कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या बोकांडी बसविली; शेट्टींचा केंद्रावर निशाणा

किरण बोळे
Thursday, 3 December 2020

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी दिली नाही. शनिवारच्या (ता. 5) बैठकीत त्यावर निर्णय झाला नाही तर सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करुन सातारा येथे आंदोलन केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

फलटण शहर (जि. सातारा) : दिल्लीमध्ये आंदोलनाला बसलेले शेतकरी एकटे नसून संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत. हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे. कायदेशीर हमीभाव व शेतकरीविरोधातील तीन विधेयके केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. या आंदोलनाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांची एकजूट दिसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

फलटण येथील न्यायलायत दाखल असलेल्या खटल्याच्या निमित्ताने शेट्टी यांच्यासह रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कडाक्‍याच्या थंडीत कुडकुडत आंदोलनाला बसलेले शेतकरी एकटे नाहीत, हे आंदोलन पंजाब-हरियाणा येथील अथवा शीख शेतकऱ्यांचे आहे, असा आव केंद्र सरकार आणत आहे. परंतू, हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे, असे स्पष्ट करुन शेट्टी म्हणाले, "केंद्र सरकारने उद्योगपतींसाठी जी तीन विधेयके शेतकऱ्यांच्या बोकांडी बसविली आहेत, त्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण व राग आहे. त्यामुळे दिल्लीत आंदोलनास बसलेले शेतकरी एकटे नसून देशातील शेतकरी त्यांच्या बरोबर आहेत हे दर्शविण्यासाठी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. 

बलकवडी धरणाच्या प्रवाही सिंचन योजनेची पाईपलाइन फुटून स्ट्रॉबेरीचे लाखोंचे नुकसान

या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे.'' या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मक्‍लेष जागरण आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी दिली नाही. शनिवारच्या (ता. 5) बैठकीत त्यावर निर्णय झाला नाही तर सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करुन सातारा येथे आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. यावेळी "स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, डॉ. रविंद्र घाडगे, स्वप्नील खानविलकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

रेल्वे फाटकाजवळचा उतार वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा; नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा

शेट्टी-खोत एकत्र; एकमेकांकडे पाहणेही टाळले

ऊस आंदोलनातील 2013 साली दाखल झालेल्या खटल्याच्या निमित्ताने शेतकरी संघटनेतील दोन दिग्गज नेते "स्वाभिमानी'चे राजू शेट्टी व "रयत क्रांती'चे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे फलटण येथे एकत्र आले होते. न्यायालयातील बार रुममध्ये हे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एक तासापेक्षाही अधिक काळ होते. केवळ काही फूट अंतरावर बसलेल्या या दोघांनी एकमेकांशी बोलणे सोडा, बघणेही टाळले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty Warns Central Government About Sugarcane Price Satara News