esakal | वाघ संवर्धनासाठी शनिवारी कऱ्हाडमधून रॅली । Tiger
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ संवर्धनासाठी शनिवारी कऱ्हाडमधून रॅली

वाघ संवर्धनासाठी शनिवारी कऱ्हाडमधून रॅली

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड : लोकांसह मुलांमध्ये वाघ व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण करण्यासह वन्यजीव संवर्धनात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत एनटीसीए फ्लॅग सोबत रॅलीची सुरूवात कऱ्हाड येथून होणार आहे. सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) ही रॅली सुरू होईल, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी दिली.

हेही वाचा: बोरामणी विमानतळप्रश्‍नी 'चेम्बर'चे शरद पवारांना साकडे!

सावंत म्हणाले, भारतास स्वातंत्र्य मिळाल्यास 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत भारतातील सर्व 51 व्याघ्र प्रकल्पातही संयुक्त गस्ती व शाळांमध्ये जनजागृती हे उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत. सात ऑक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे.

या वर्षी " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून जॉयनींग इंडीयाज टायगर डॉटस, इंडीया फॉर टायगर आणि रॅली ऑन व्हील हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत 1973 मध्ये प्रथम स्थापन झालेल्या मानस, सिमलिपाल, पलमाऊ, कॉर्बेट, मेळघाट, बंदिपूर, कान्हा, रणथंबोर, सुंदरबन या नऊ व्याघ्र प्रकल्पामध्ये भव्य कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा: संकेश्वर : चालत्या बसमध्ये प्रेमप्रकरणातून हल्ल्यात विवाहिता गंभीर

या व्याघ्र प्रकल्पांच्या भौगोलिकदृष्टया जवळ असणारे व्याघ्र प्रकल्प रॅलीद्वारे तेथे पोहोचून आयोजनात सहभागी होणार आहेत. या रॅली दरम्यान लागणारी गावे, शहरे व शाळांमध्ये व्याघ्र व संवर्धन विषयी लोक व विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. वन्यजीव संवर्धनात भरीव योगदान दिलेले वनकर्मचारी, वनशहिदांचे नातलग यांचा सन्मान केला जाणार आहे. व्याघ्रगीते, पथनाटय हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

कऱ्हाड येथून एनटीसीए फ्लॅग सोबत रॅलीची सुरूवात होऊन कोल्हापूर, बेळगाव मार्गे स्थानिक लोकप्रतिनिधी, व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी,कर्मचारी, स्थानिक लोक, विद्यार्थी, पश्चिम घाटातील नव्याने घोषित झालेल्या जोर, जांभळी, पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा, आंबोली, तिलारी संवर्धन क्षेत्रातील वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत जनजागृती करत रॅली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प येथे पहिला टप्पा पूर्ण करेल. तेथून भद्रा व्याघ्र प्रकल्प येथे पोहोचून शेवटी बंदिपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटक येथे रॅली जाईल.

loading image
go to top