esakal | आमचं ठरल : राज्यात उद्यापासून रेशन वाटप बंद

बोलून बातमी शोधा

Ration
आमचं ठरल : राज्यात उद्यापासून रेशन वाटप बंद
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी पडून आहेत. त्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक मेपासून जिल्ह्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारही संपावर जाणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, ""ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष गजानन बाबर, विजय गुप्ता, नितीन पेंटर यांच्या नेतृत्वाखाली एक मेपासून राज्यातील सरकार मान्य स्वस्त दुकानदारांचा संप आहे. दुकानदारांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राज्यव्यापी संप आहे.

जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार त्यात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी संपात एकजुटीने सामील व्हावे. राज्य फेडरेशनचे पुढील आदेश येईपर्यंत संप सुरू ठेवावा. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानदार नेहमीच सरकारला सहकार्य करत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न शासनस्तरावर मांडले जात आहेत. ते अद्याप मान्य न झाल्याने एक मेपासून राज्यात संप करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.''

Video पाहा : मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची! पालकमंत्र्यांची सून आरोग्य सेवेत

क्रिकेटच्या देवा, सांग तू काय मदत केलीस...

सातारकरांनाे! काळजी घ्या, घाबरु नका; आलाय नवा आदेश