

Rebel candidates crowd the nomination counters in Satara, intensifying political tension ahead of local elections.
Sakal
सातारा : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे निश्चित केलेल्या दोन्ही राजांनी प्रदीर्घ वाटाघाटीनंतर उमेदवार निश्चित केले. मात्र, दोन्ही राजे व भाजपचे मिळून ५० पेक्षा जास्त नाराज इच्छुकांनी दोन्ही राजांचा कौल डावलत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ही बंडखोरी शमविण्यासाठी दोन्ही राजांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.