प्रवाशांकडून जादा पैसे घेणाऱ्या 27 वाहतुकदारांना आरटीओने ठाेठावला दंड

प्रवाशांकडून जादा पैसे घेणाऱ्या 27 वाहतुकदारांना आरटीओने ठाेठावला दंड

सातारा : दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट दरात जादा आकारणी करून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी वाहनांवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला. धोकादायक प्रवासी वाहतूक, जादा भाडे आकारणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी आरटीओ विभागाने विशेष मोहीम राबवून 207 वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये 27 खासगी वाहने दोषी आढळून आल्याने नऊ हजार सातशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

दरवर्षी दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकारमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परिणामी प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा गैरफायदा घेत खासगी वाहतूकदार जादा भाडे दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करतात. या पार्श्‍वभूमीवर जादा तिकीट आकारणी करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आरटीओ कार्यालयानांना दिले होते. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून आरटीओने कारवाईला सुरवात केली. प्रत्येक जिल्ह्यात वाहनांची तपासणी करून जादा भाडे आकारणे, नियमापेक्षा जास्त प्रवासी बसविणे, गाडीच्या रचनेत बदल करणे यासह वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली. दिवाळीअगोदर 13 ते 24 नोव्हेंबरअखेर 207 वाहनांची तपासणी केली. त्यात साताऱ्यात 175 वाहने तपासण्यात आली. त्यातील 19 वाहनांवर, तर कऱ्हाडला तपासलेल्या 32 पैकी आठ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात 27 खासगी बस दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातून प्रशासनाला नऊ हजार 700 रुपयांचा महसूल मिळाला.

क्‍लोजर डिव्हाईस तंत्रज्ञानाव्दारे कृष्णात युवतीला जीवदान; डॉक्टरांची कठीण समस्येवर मात

कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि सातारा परिवहन विभागाने सर्वाधिक तपासणी व कारवाई केलेल्या वाहनांची संख्या आहे. कारवाईदरम्यान आरटीओ विभागाने जादा आकारणीबाबत सहा बुकिंग काउंटरचीही तपासणी केली. त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही त्या-त्या संवर्गातील वाहतुकीचे भाडेदर निश्‍चित केले होते. खासगी कंत्राटी परवाना वाहनधारकांना भाडेदर ठरवून देण्यात आला आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक दर आकारून लुट करणाऱ्यांवर धडक कारवाई केल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूकदारांना चाफ बसणार आहे. 


दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणत ये-जा सुरू असते. प्रवाशांकडून जादा आकारणी करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढेही जादा भाडे घेणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू राहील. 

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com