

Sahyadri Tiger Reserve Villagers Demand Rehabilitation Before Tiger Release
Sakal
मलकापूर : जावळी तालुक्यातील वेळे, देऊर या गावांत अगोदरच वन्यप्राण्यांनी स्थानिकांना जगणे मुश्कील केले आहे. येथील ग्रामस्थांचे शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही. त्यातच आता सह्याद्री प्रकल्पात वाघ सोडून येथील ग्रामस्थांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.