दिव्यांग "सागर' धडपडतोय आपल्या माणसांसाठी; अनेकांना केली मोलाची मदत

दिव्यांग "सागर' धडपडतोय आपल्या माणसांसाठी; अनेकांना केली मोलाची मदत

सातारा : तो तसा चांगला होता, पूर्ण तंदुरुस्त अन्‌ हुशारही होता. चालताना त्याचा तोल जाऊ लागला. तपासणी केली अन्‌ साताऱ्यातील भोकरे कुटुंबीयांच्या तोंडचे पाणी पळाले. सागरच्या मेंदूतील तीन ऑपरेशन करावी लागली. तो बरा झाला पण काहीशी वाचाही गेली अन्‌ बहेरपणही पदरी पडले. मात्र, सागर हरला नाही. दिव्यांगपण विसरून दिव्यांगांसाठी तो झटत राहिला. धडपडणाऱ्या सागरने आजवर शंभराहून अधिक दिव्यांगांना शासकीय मदत मिळण्यास मोलाची मदत केली आहे.
 
सागर रमेश भोकरे हे त्याचे नाव. वडिलांचे छत्र हरपलेला सागर हा आई व भावासह साताऱ्यातील संगम माहुली फाटा येथील राजभोई हाउसिंग सोसायटीमध्ये राहतो. 30 वर्षांच्या सागरने मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर चालताना तोल जाऊ लागल्याने त्याची वैद्यकीय चाचणी केली. चाचणीत त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. त्याची तीन ऑपरेशन झाली. त्यामध्ये त्याच्या दोन्ही कानाच्या नसा कापल्या गेल्या. त्यामुळे त्याची श्रवणशक्ती गेली. सध्या तो ऐकू शकत नाही अन्‌ व्यवस्थित चालूही शकत नाही. त्याला निट बोलताही येत नाही. परंतु, या आजाराने न डगमगता सागर हा सूर्यनमस्कार, प्राणायाम आदी साधना नित्य करत राहिला. 2019 साली रेल्वेची परीक्षा दिली. त्यामध्ये पास होऊन डॉक्‍युमेंट पडताळणीला मुंबई ऑफिसला गेला. परंतु; लॉकडाउनमुळे भरती प्रक्रिया थांबली. अशाही मानसिकतेत त्याने सेवा करण्यासाठी अपंगांचेच क्षेत्र निवडले. मात्र, त्याला ऐकूच येत नसल्याने फक्त व्हॉट्‌सऍपवरूनच त्याच्याशी संपर्क करावा लागतो. 
सागरला मोबाईल ऑपरेटिंग चांगले येते. त्याने त्याचा उपयोग करून दिव्यांगांना मदत करत राहण्याचे ठरवले. पेन्शनधारक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक दुर्बल, शारीरिक अपंगत्व असलेल्या पाल्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी सागरने 2018 सालापासून विनामोबदला त्यांचे प्रस्ताव तयार करून दिले. व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांगांना एकत्र करण्याचे कार्य करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो सतत धडपडत राहतो. दिव्यांगांना शासकीय योजनाचा लाभ घेता यावा, यासाठी तो त्यांना नेहमी मदत करत राहात आहे.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद 
 
स्वतःच्या अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता सागर दिव्यांगांसाठी प्रामाणिकपणे झटत आहे. त्याच्या या कर्तृत्वाचे विविध संस्था आणि व्यक्तींनी भरभरून कौतुक केले आहे. कोणाही दिव्यांगाना शासकीय पेन्शन, मदतीसाठी प्रस्ताव तयार करावयाचे असतील तर राज भोई हाउसिंग सोसायटी, संगम माहुली फाटा येथे तसेच 8087882966 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सागरने केले आहे. 

असाही कोविडयोद्धा.. 

कोरोनाच्या भर उद्रेकाच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी इतरांना विविध प्रकारे मदत केली. त्या बहुतेकांना शासन आणि सामाजिक संस्थांनी कोविडयोद्धा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. सागर भोकरे हाही त्या काळात दिव्यांगांना मदत करण्यात आघाडीवर होता. स्वतः अपंग असतानाही कोरोना काळात इतर दिव्यांगांना मदत केल्याबद्दल मुंबईतील नामवंत संस्थेने त्याचा "दिव्यांगयोद्धा पुरस्कार' देऊन सन्मान केला आहे.

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com