
सातारा : युरोप खंडातील सर्वोच्च उंचीचे शिखर माउंट एलब्रुस सर करताना अनेकदा अडथळे आले. मात्र, धीर खचू दिला नाही. उणे दहा अंश सेल्सिअस तापमान आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला भिडावे लागत होते; पण मनात असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरच अंतिम ध्येयापर्यंत पोचता आले, अशी भावना गिर्यारोहक धैर्या कुलकर्णी हिने व्यक्त केली. एलब्रुस सर केल्यानंतर आता माझ्या शाळेतील मित्र- मैत्रिणींना गिर्यारोहणात रस निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. माझ्या यशाइतकाच त्याचाही मला आनंद झाला, असेही तिने नमूद केले.