अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत

एक कोटी ७ लाख टन गाळप, १४ कारखान्यांत गाळप सुरू ; मे महिन्यापर्यंत हंगाम चालणार
Sugarcane
SugarcaneSakal

सातारा - जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी गाळप करूनही अद्याप अडीच लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. याच वेगाने गाळप सुरू राहिल्यास मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर सह्याद्री आणि अजिंक्यतारा कारखाने पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत सात खासगी व सात सहकारी साखर कारखान्यांनी मिळून एक कोटी सात लाख ८० हजार ५९४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी १७ लाख २४ हजार १६५ क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे.

जिल्ह्यात सहकारी आठ व खासगी सात साखर कारखाने असून त्यापैकी खंडाळा, प्रतापगड व किसन वीर कारखान्याने हंगामाच्या सुरवातीला गाळप केले नाही, तर किसन वीर कारखान्याने आता कुठे गाळप सुरू केले आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस शेजारील अन्य कारखाने नेत आहेत. उर्वरित सर्व साखर कारखान्यांचे गाळप चांगल्या प्रकारे सुरू आहे. प्रतापगड व खंडाळा कारखान्याने गाळप सुरू केलेले नाही. त्यामुळे सहा सहकारी व सात खासगी कारखान्यांनी गाळप केले आहे. सहकारी कारखान्यांनी आतापर्यंत ४४ लाख ८२ हजार ५०२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५२ लाख ९१ हजार २० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांनी आतापर्यंत एकूण ६२ लाख ९८ हजार ०९२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६४ लाख ३३ हजार १४५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे.

जिल्ह्यात अद्याप अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. हा ऊस आगामी मे महिन्यात पूर्ण गाळप होणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश कारखान्यांचे गाळप संपेल व अजिंक्यतारा आणि सह्याद्री कारखान्यांचे गाळप मे महिन्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

कारखानानिहाय साखरनिर्मिती (क्विंटलमध्ये)

सहकारी कारखाने : श्रीराम- ५५३८००,

कृष्णा- १४४२७४०, किसन वीर- ३३५०,

देसाई कारखाना- २९८४५०, सह्याद्री- १५२१२६०, अजिंक्यतारा- ८१४८४७, रयत- ६५६५८०.

खासगी कारखाने : दत्त इंडिया (फलटण)- ४४७५००, जरंडेश्वर- २०१९२००, जयवंत शुगर- ७१०९५०, ग्रीन पॉवर शुगर- ६०७१००, स्वराज्य इंडिया- ७०६४९५, शरयु ॲग्रेा (फलटण)- ९९१९५०, खटाव-माण ॲग्रो- ८६९१५०.

(ही आकडेवारी १७ एप्रिलच्या अहवालानुसार आहे)

जरंडेश्‍वर, सह्याद्री, कृष्णा आघाडीवर

यावर्षी जरंडेश्वर साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप केले आहे. त्यांनी १८०१४३० मेट्रिक टन उसाचे गाळप करून २०१९२०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी कारखान्यांमध्ये सह्याद्री व कृष्णा कारखान्याने सर्वाधिक गाळप केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com