esakal | कोरोनाबाधिताचे उपजिल्हा रुग्णालयातून पलायन; सतर्कतने धाेका टऴला
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

कोरोनाबाधिताचे उपजिल्हा रुग्णालयातून पलायन; सतर्कतने धाेका टऴला

sakal_logo
By
किरण बाेळे

फलटण शहर (जि. सातारा) : शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका ज्येष्ठ कोरोनाबाधित रुग्णाने पलायन केले. दोनच दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा, असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का, असा सवाल व्यक्त होत आहे.

कोळकी येथील मालोजीनगर भागात एका दुकानाच्या कट्ट्यावर संबंधित बाधित व्यक्ती येऊन बसली. त्यावेळी तेथे बसलेल्या पत्रकारांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांच्या हाताला सलाईनची खूण दिसून आल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण जिंती (ता. फलटण) येथील असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनीही चौकशी केली असता संबंधित ज्येष्ठ व्यक्ती जिंती येथीलच असून ती कोरोनाबाधित असल्याने फलटणमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

त्यानंतर प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. नगरपालिकेने पाठविलेल्या ऍम्ब्युलन्समधून त्यांना पुन्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे या व्यक्तीस आतमध्ये घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. तेव्हा प्रांतांनी फोन करताच त्यांना दाखल करून घेण्यात आले.

'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील

Video पाहा : भारतमाता की जय, अमर रहे'च्या घोषणांनी ओझर्डे दुमदुमले

सातारकरांनाे! सावधान : दूस-या लाटेतील सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झालाय