शंभुराज देसाई उंडाळकरांच्या भेटीला; कऱ्हाडात दोघांची कमराबंद चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभुराज देसाई उंडाळकरांच्या भेटीला; कऱ्हाडात दोघांची कमराबंद चर्चा

शंभुराज देसाई उंडाळकरांच्या भेटीला; कऱ्हाडात दोघांची कमराबंद चर्चा

sakal_logo
By
हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (ता. २१) होत आहे. त्यापार्श्वभूमीवर कऱ्हाड सोसायटी गटातील उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांची भेट गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज घेतली. त्यांची बाजार समितीत अर्धातास कमराबंद चर्चा झाली. मदतानाच्या पार्श्वभुमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

सातारा जिल्हा बॅकेसाठी जोरदार रणधुमाळी सुरु आहे. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटातुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर निवडणुक रिंगणात आहेत. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केल्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीचे मतदान अवघ्या दोनच दिवसावर आल्याने जोरदार घमासान सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री देसाई यांनी आज उंडाळकर यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा झाली. त्यांची मतदानासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही चर्चा महत्वाची मानली जात आहे. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रा. धनाजी काटकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक

दंगे करणाऱ्यांना अद्दल घडवणार

अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरातील दंगल पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणली. तेथे झालेल्या दंगली पूर्वनियोजित नसल्याचा निष्कर्ष कोणी काढला हे माहिती नाही. मात्र दंगेखोरांची ओळख पटलेली आहे. जाणिवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना पोलिस सोडणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

राज्यात दंगल काबुत करण्यात सरकारला अपयश आले असा आरोप चुकीचा असून वेळेत जादा कुमकेसह पोलिस अधिकारी घटनास्थळी चोवीस तास हजर होते असेही त्यांनी स्पष्ट केले

loading image
go to top