coronavirus update satara
coronavirus update satara

चिंताजनक! सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी हाेईना

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या पॉझिटिव्‍हिटी रेटचा आलेख कमी झाला हाेता. परंतु जिल्ह्यात पुन्हा बाधितांची संख्या वाढू लागल्याने त्यामध्ये चढ उतार हाेत आहे. दरम्यान आज (शुक्रवार) जिल्ह्यातील 9810 नागरिकांच्या तपासणीअंती 814 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. (satara-coronavirus-update-covid19-patients-increased-marathi-news)

गेल्या काही दिवसांत कोरोना प्रादुर्भावाची साखळी तुटताना दिसत हाेती. तसेच, जिल्ह्यातील गृह विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला हाेता. मागील काही दिवसांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही दहा हजारांहून खाली येत आहे. जिल्ह्यात मृत्यूची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज नऊ हजार 810 चाचण्या करण्यात आल्या असून 814 बाधित आढळले आहेत.

coronavirus update satara
मतदारांनाे! 'कृष्णा’ च्या निवडणुकीत असे करा मतदान

सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 748 जणांना गुरुवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

coronavirus update satara
महाविकास आघाडी भक्कम, भाजपचं 'स्वप्न' होणार भंग

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर व हिंगोली या कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी गुरुवरी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिसरी लाट आणि डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचाही धोका आहे. जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे. सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करावी. फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारण्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करा अशा सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com