कऱ्हाडमध्ये खासगी सावकारावर गुन्हा

सावकारी
सावकारी

कऱ्हाड (जि. सातारा) : पोलिसांची माहिती अशी की, आयाज शेख यांनी फेब्रुवारी महिन्यात गणेश वायदंडे याच्याकडून मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे मागितले. त्यावर गणेशने 100 रुपयांच्या स्टॅंपवरती काहीतरी लिहून घेऊन त्यावर सही घेऊन, त्याची दुचाकी ताब्यात घेतली, तसेच बॅंकेचे कोरे दोन चेक घेऊन 15 हजार रुपये दिले; परंतु गणेश याने सदर स्टॅंपवरती 15 हजारऐवजी 20 हजार रुपये घेतले असे लिहिले होते. त्या वेळी त्याने हे पैसे तुला 20 टक्के व्याजाने देत आहे, असे सांगितले. त्यानंतर मी जमेल तसे गणेशला थोडे थोडे पैसे दिले.

मे महिन्यापर्यंत घेतलेले 15 हजार व व्याजाचे पाच हजार असे 20 हजार परत दिले. त्यानंतर मी माझी दुचाकी परत दे, असे म्हटल्यावर गणेशने तू आतापर्यंत घेतलेल्या रकमेचे व्याजच दिले आहेस, अजून मुद्दल बाकी आहे. घेतलेले 15 हजार रुपये परत दे असेही तो म्हणाला. त्या वेळी गणेश जादा पैसे मागू लागल्याचे लक्षात आल्यावर तो विनापरवाना सावकारी करून लोकांना दिलेल्या पैशापेक्षा जादा पैशांची मागणी करून वारंवार त्रास देत असल्याचे शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या फिर्यादीवरून विनापरवाना सावकारी व्यवसायप्रकरणी गणेश वायदंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सावकारांची थेट तक्रार द्या 
खासगी सावकारीप्रकरणी जर कोणा नागरिकाला सावकारांकडून त्रास होत असेल, तर त्यांनी थेट कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com