esakal | 'आई, तू पंजाबी ड्रेस का घातलास'? मुलाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

'आई, तू पंजाबी ड्रेस का घातलास'? मुलाची आत्महत्या

सहायक फौजदार रामचंद्र फरांदे पुढील तपास करत आहेत.

'आई, तू पंजाबी ड्रेस का घातलास'? मुलाची आत्महत्या

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : आईला पंजाबी ड्रेस घालू नको, तू साडीच नेस, असे तिच्या मुलाने सांगितले. मात्र  आईने पंजाबी ड्रेस घातला. यामुळे चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेरु शौकत भोसले (वय 16) असे या मुलाचे नाव आहे. नागठाण्यातील बाजारमाळ परिसरात भोसले कुटुंबीय वास्तव्यास आहे. मंगळवारी सायंकाळी शेरूची आई ही घरात होती. त्यावेळी तिने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. शेरुने 'तू ड्रेस का घातलास. साडी नेस,' असे तिला सांगितले. मात्र, आईने पंजाबी ड्रेस तसाच ठेवला.

या गोष्टीचा शेरु याला राग आला. रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. याची माहिती आईने कुटुंबियांना दिली. त्यानंतर सर्वांनी शेरुचा शोध सुरु केला. शेरु याने घरापासून जवळच असलेल्या  झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक फौजदार रामचंद्र फरांदे पुढील तपास करत आहेत.

MSEB विरोधात शाही मस्जिद परिसरातील व्यापारी आक्रमक

त्या प्रकरणी संजय राठोड दाेषी नाहीत; गृहराज्यमंत्र्यांची क्लिन चीट

हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर भाजप आणि सेनेत हा फरक आहे

नाशिकातील मराठी साहित्य संमेलनाविरुध्द दलित महासंघ आक्रमक

सातारा जिल्ह्यातील कवठे गावाला शौर्याची मोठी परंपरा 

Edited By : Siddharth Latkar