साताऱ्यात वृद्धेची निर्घृण हत्या; शहरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

गिरीश चव्हाण
Saturday, 16 January 2021

साताऱ्यातील कृष्णानगर येथे 65 वर्षीय वृद्धेचा धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सातारा : साताऱ्यातील कृष्णानगर येथे गजानन सोसायटीत केशव निवास येथे 65 वर्षीय वृद्धेचा धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने गळा चिरून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरातील हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. 

जया गणेश गायकवाड-पाटील (वय 65) असे या वृद्धेचे नाव असून, घटनास्थळी तत्काळ पोलिस दाखल झाले होते. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ आदी दाखल झाले होते. तसेच डॉग स्कॉड, ठसे तज्ञ बोलवण्यात आले असून, पोलीस शोध घेत आहेत. या हत्येने संपूर्ण शहर हदरले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने त्या वृध्द महिलेची का हत्या केली असावी, याचे उत्तर सध्या तरी अनुत्तरीतच आहे. या घटनेचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Crime News Death Of A Woman In Satara