esakal | मंगेशच्या खून प्रकरणी पायगुडेस नाशकात अटक; लोणंद पाेलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

मंगेशच्या खून प्रकरणी पायगुडेस नाशकात अटक; लोणंद पाेलिसांची कामगिरी

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथे पिंपळे (ता. पुरंदर) येथील मंगेश सुरेश पोमन (वय ३५) याचा खून करून त्याचा मृतदेह (dead body) नीरा उजवा कालव्यात (nira) टाकून दिल्याप्रकरणातील दुसरा संशयित ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली) यास लोणंद पोलिसांनी (lonand police) नाशिक (nashik) येथे आंबाड परिसरात रविवारी अटक केली. (satara-crime-news-lonand-police-arrested-criminal-in-nashik)

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना मंगेश पोमन, वैभव जगताप आणि ऋषीकेश पायगुडे या तिघांची वादावादी झाली होती. दरम्यान, हे तिघेही जामिनावर सुटले होते. त्यानंतर वैभव आणि ऋषीकेश या दोघांनी मंगेशचा खून करून त्याचा मृतदेह येथील नीरा उजवा कालव्यात फेकून पुरावा नाहिसा केला होता.

हेही वाचा: उन्‍हाळी सुटीचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून शाळा सुरु

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्‍या सूचनेनुसार लोणंदचे सहा‍यक निरीक्षक विशाल वायकर करत होते. यासाठी वायकर यांनी उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार शौकल सिकिलकर, देवेंद्र पाडवी, कर्मचारी महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्‍वर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाज शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, प्रिया दुरगुडे, मल्‍हारी भिसे यांची पथके केली होती.

तपासात वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर) यास दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्याने खुनाची कबुलीही दिली होती. या प्रकरणातील दुसरा संशयिताचा शोध सुरू होता. नाशिक येथे आंबाड परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ऋषीकेशला जेरबंद केले.

हेही वाचा: गाेळीबार प्रकरणी इंदापूरसह, बारामतीचे युवक पोलिस कोठडीत

काही सुखद बातम्या वाचा

loading image
go to top