
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी "एलसीबी'चे निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या.
सातारा : देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोबाईल असा 76 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. साहिल भरत जाधव (वय 20, रा. मामुर्डी, ता. जावळी) व अल्पवयीन मुलाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी "एलसीबी'चे निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले आहे. दरम्यान, काल शिरवळ (ता. खंडाळा) येथील लॉकीम फाट्याजवळ दोघे बेकायदा पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गर्जे यांना तेथे सापळा रचण्यास सांगितले होते.
कृष्णा काठावरील मनोमिलनानं बदललं राजकारण; कार्वेत ऐतिहासिक सत्तांतराची पुनरावृत्ती शक्य?
रात्री अकराच्या सुमारास त्यांना दोघे पुण्याकडून लॉकीम फाट्याकडे आले. पोलिस पथकाने त्यांची झडती घेतली. त्या वेळी त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोबाईल असा 76 हजार 200 रुपयांचा ऐवज सापडला. त्यांच्याविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्जे यांच्यासह सहायक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार कांतिलाल नवघणे, आतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, विक्रम पिसाळ, केतन शिंदे, संजय जाधव, विजय सावंत हे या कारवाईत सहभागी झाले होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे