esakal | वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना वाढे येथील हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : वाढे (ता. सातारा) येथील हॉटेलच्या खोलीत सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून 1 लाख 24 हजारांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले बडे व्यापारी आणि राजकीय पक्षाशी निगडित आहेत. 

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना वाढे येथील हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शुक्रवारी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना त्या हॉटेलवर छापा टाकत जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. 

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप 

पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत त्या ठिकाणाहून अमोल चंद्रकांत पोपळे (रा. गुरुवार पेठ), कपिल रामस्वरूप अग्रवाल (रा. भोसले मळा, करंजे), राजू इक्‍बाल शेख (रा. कोरेगाव), नितेश जयवंत कदम (रा. मंगळवार पेठ, सातारा), विनायक भानुदास इथापे (रा. सदरबझार, सातारा), दिलीप नामदेव इरळे (रा. सैदापूर, ता. सातारा) तसेच हॉटेल मालक गणपतराव विलास नलवडे (रा. वाढे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट, जुगाराचे साहित्य असा सुमारे एक लाख 24 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी धोंडिराम हंकारे यांनी फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी हॉटेलचालकावर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

ग्रामस्थांनाे! उंब्रजमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, काळजी घ्या

दरोड्यातील संशयित म्हणून त्याला पोलिसांनी पकडला हाेता, पुढे काय घडले वाचा सविस्तर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top