esakal | satara: राष्ट्रीय पोषण अभियानात साताऱ्याचा राज्यात डंका
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय पोषण अभियान

राज्यात सर्वाधिक उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आयसीडीएस विभागाचा राज्यात डंका वाजला आहे.

राष्ट्रीय पोषण अभियानात साताऱ्याचा राज्यात डंका

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने (आयसीडीएस) राष्ट्रीय पोषण अभियानात उल्लेखनीय काम केल्याने सातारा जिल्हा या अभियानात राज्यात पहिला आला आहे. राज्यात सर्वाधिक उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आयसीडीएस विभागाचा राज्यात डंका वाजला आहे.

हेही वाचा: सातारा : गुन्ह्यात मदतीसाठी लाच घेताना सहायक फौजदारच जाळ्यात

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके आदींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिला, मुली, बालके यांना सकस आहार मिळावा, यासाठी हा विभाग काम करत असतो. राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत या विभागाने पोषण आहाराचे महत्त्‍व पटवून देण्याबाबत अनेक प्रात्यक्षिके घेऊन विविध उपक्रम राबविले. तसेच, अंगणवाड्यांच्या परिसरात परसबागा तयार करणे, गृहभेटी देऊन गर्भवती महिलांना मार्गदर्शन करणे, लसीकरणाबाबत जनजागृती करणे आदी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली.

हेही वाचा: इंद्रजाल विक्रीप्रकरणी सातारा, कऱ्हाडामध्ये वन विभागाचे छापे

अभियान यशस्वीपणे राबवून जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल महिला व बालविकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

loading image
go to top