

Satara: Injured bull ‘Raja’ lies bloodied after bravely fighting off a leopard in Pilaṇī village.
Sakal
सातारा: मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ चालू आहे. त्यामुळे त्यातच शासनाकडून उपयायाेजनाच्या हालचाली सुरु असतानाचा खालची पिलाणी (ता. सातारा) परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी सकाळी बैल व बिबट्याची जीवघेणी झुंज झाली. चवताळून हल्ला करणाऱ्या बिबट्याचा दोन बैलांनी तितकाच कडवा प्रतिकार केला. या जीवघेण्या झुंजीत एका बैलाचे शिंग मोडले असून तो रक्तबंबाळ झाला. बैलाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा आरडाओरडा व बैलांचा कडवा प्रतिकार यामुळे अखेर बिबट्याने धूम ठोकली. डोंगराच्या पायथ्याशी हा थरारक प्रकार घडला.