माध्यमिक शाळांतील डी.एड. शिक्षकांचा निर्धार; मागण्यांच्या पुर्ततेसाठी उपोषणास बसणार

संजय जगताप
Friday, 4 September 2020

संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.

मायणी (जि.सातारा) : सेवाज्येष्ठता व पदोन्नती देण्यात होणार्‍या अन्यायाला वाचा फोडून शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी माध्यमिक शाळांतील डी.एड. शिक्षक उद्या शनिवार (ता. पाच) शिक्षक दिनी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. माध्यमिक शाळेत डी.एड. वेतनश्रेणीत लागलेल्या प्रशिक्षित शिक्षकांच्या सेवाजेष्ठता व पदोन्नतीविषयी प्रशासनामध्ये उदासीनता व दुजाभाव दिसून येत आहे. त्यामुळे आपले अधिकार व हक्क प्राप्त करण्यासाठी, न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यावर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत होऊन उद्या शिक्षक दिनी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.

यूकेचे पंतप्रधान करु शकतात मग माेदी का नाही? पृथ्वीराज चव्हाण

आत्मनिर्भर गाव! अंबासनची विकासगंगा सुसाट; विविध योजना राबवून गावाचे बदलले रूपडे  

यावेळी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा पद्मा तायडे कार्याध्यक्ष आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नंदकिशोर गायकवाड, संघटनेचे महासचिव बाळा आगलावे, उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, सत्यमेव जयते शिक्षक संघटनेचे’ अध्यक्ष दिलीप गव्हाळे,राजेंद्र मसराम, बंडूभाऊ धोटे, प्रशांत सपकाळ, विभागीय सचिव आर डी पाटील, लक्ष्मण राठोड, काळूराम धनगर, निमंत्रीत सदस्य प्रशांत बोर्डे, विजया गायकवाड, देविदास जांभुळे, शांताराम खांबे आदी उपस्थित होते.

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Teachers Agitation For Demands On Teachers Day