

Online Deals Turning Dangerous: Cybercrime on the Rise in Satara District
Sakal
-सिद्धार्थ लाटकर
सातारा: आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या उपचारासाठी तातडीने पैसे भरायचे आहेत. माझा भाऊ तुम्हाला आॅनलाइन पैसे पाठवेल ते मला द्याल का, अशी विनंती अनोळखी व्यक्ती तुम्हाला करते. समोरच्याची गरज लक्षात घेता तुम्ही होकार देता. तुमच्या मोबाईलवर पैसे येतात आणि तुम्ही तुमच्याकडचे रोख पैसे त्यास देता. काही दिवसांनंतर पोलिसांचे बोलावणे आल्यानंतर आपण सायबर फिशिंगचे बळी झाल्याचे लक्षात येते. असे विविध प्रकार घडत असून, अशा बतावणीला भुललेल्या अनेकांना पोलिस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे बतावणीला भुलण्यापेक्षा सजग आणि समजदार होणे आवश्यक आहे.