सातारा : फायर ऑडिट करण्याचे रुग्णालयांना आदेश

नगर आगीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सजग; टाळाटाळ किंवा विलंब करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
fire audit
fire auditsakal

सातारा : नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी व खासगी रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, ती करण्यास टाळाटाळ किंवा विलंब करणाऱ्यांवर तातडीने आपत्ती व्यवस्थापन तसेच साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यात अनेक रुग्णालयांत आग लागण्याचा, ऑक्सिजन गळतीसारख्या अनेक दुर्घटना घडल्या. त्यामध्ये नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला लागलेली आग, नागपुरातील वेल्ट्रिट कोविड केअर सेंटरला लागलेली आग, भांडूपमधील कोविड रुग्णालयातील आग, विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आग अशा घटनांचा समावेश होता. या घटनांमध्ये नवजात बालकांसह युवक व ज्‍येष्ठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.

fire audit
भिवंडीत लग्नमंडपात फटाके फोडणे भोवले; आग लागल्याने २५ दुचाकी खाक

त्यामुळे आरेाग्य विभागातील निष्काळजीपणा ठळकपणे समोर आला होता. असे प्रकार घडल्यानंतरही शासन व आरोग्य विभागाने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. नगर येथील घटनेने ते अधोरेखित केले. तीन आठवड्यांपूर्वी नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली होती. या आगीमध्ये सुरुवातीला दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर एक रुग्ण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ वर पोचली होती. या घटनेमुळे राज्यातील रुग्णालयांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर राज्य शासनही खडबडून जागे झाले. त्यातून राज्यातील रुग्णालयांच्या आग प्रतिरोधक क्षमतेचा मुद्दा पुढे आला. त्याची दखल स्थानिक प्रशासनाने घेण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही जिल्ह्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सजग भूमिका दाखवली आहे. भविष्यात जिल्ह्यामध्ये नगरप्रमाणे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक हे जिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालय, सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी असणार आहेत.

fire audit
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क

त्यांनी शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट शासकीय अधिकाऱ्यांमार्फत करून घ्यायचे आहे. तर, खासगी रुग्णालयांनी आपल्या स्तरावरून आपल्या रुग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण करून जिल्हा शल्यचिकित्सकांना याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरेाग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या सर्व कोरोना केअर सेंटरचे नोडल अधिकारी असणार आहेत. त्यांनी या रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे.

जिल्ह्यातील रुग्णालये...

५००

खासगी रुग्णालये

१९

जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय

४७२

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे

२८

कोविड रुग्णालय व कोरेाना सेंटर

रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी फायर ऑडिट सक्तीचे केले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालय चालकांनी आपल्या रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करून अहवाल सादर करावा.

-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com