डोंगराचे टोक गाठा... मोबाईलची रेंज मिळवा!

patan
patan

मल्हारपेठ (जि. सातारा) ः संचारबंदीचा नेटकऱ्यांनाही फटका बसला आहे. इंटरनेटची रेंज मिळत नसल्यामुळे युवक डोंगरावरील टेकडीकडे धाव घेत आहेत. लॉकडाउनसह कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यापुढील काही दिवस तरी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर वाढण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात मोबाईलची रेंज हा डोकेदुखीचा विषय ठरणार आहे. 

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल हे आवश्‍यक साधन झाले आहे. त्यात अँड्रॉईड मोबाईलला अधिक पसंती आहे. सध्या मोबाईल हे संपर्काबरोबरच माहिती देणारे भांडार, करमणुकीचे साधन बनले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासही ऑनलाइन सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. त्यासाठी संबंधित शाळांकडून त्याची कार्यवाही होत आहे. विद्यार्थ्यांचीही या अभ्यासासाठी मोबाईलच्या रेंजची अडचण जाणवत आहे. ग्रामीण भागातील पालक मुलांसाठी मोबाईल रेंज मिळण्याची धडपड करताना दिसत आहेत. मात्र, मोबाईल कंपन्याची रेंजच गायब होत असल्याने सर्वच ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. 

मल्हारपेठ परिसरातही सर्वच कंपन्यांचे मोबाईल टॉवर्स आहेत. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळे मोबाईल सिमकार्ड पोर्टिंगमुळे ग्राहक ओढाओढीची स्पर्धाच सर्वत्र पाहायला मिळते. त्यात ग्राहकांचे प्रचंड नुकसान होत आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून सर्वच मोबाईल सिमकार्ड कंपन्यांत ग्राहक आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅनचा वापर केला जात आहे. परिसरात बीएसएनएलचे तीन तेरा वाजले आहेत. एका कंपनीने तर ग्राहकांची फसवणूक केल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांत आहे. अन्य कंपन्यांचीही ओरड आहे. त्यामुळे ग्राहकांत द्विधा मनःस्थिती आहे. सध्यातरी ग्राहक जसे नेटवर्क मिळेल, तसे घेत आहेत. संचारबंदीमुळे इंटरनेट वापरणारांची संख्या वाढली असल्याने मोबाईल टॉवरच्या मेगाहार्टज्‌पेक्षा वापर दुप्पट, तिप्पट वाढल्यामुळे कंपन्याही हतबल आहेत. तातडीने संबंधित मोबाईल कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मोबाईल टॉवरच्या नेटवर्कची मर्यादा वाढवून ग्राहकांची फसवणूक थांबवण्याची मागणी मल्हारपेठ, मारुल हवेली, नवारस्ता, उरुल परिसरातून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com