क-हाडात जनजीवन ठप्प; सातारकरांची कास, बामणाेलीला कूच

Satara Rain
Satara Rain

क-हाड : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे (rain) बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खाेळंबा झाला आहे. साता-यातील राधिका रस्ता येथे पाणी साचल्याने वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. कास (kass), बामणाेली (bamnoli) परिसरात पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक (tourist) वन डे ट्रीपसाठी जात आहेत. (satara-heavy-rainfall-karad-mahableshwar-koyna-dam-breaking-news)

क-हाड शहर व तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कालपासून आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत कराड तालुक्यात सुपने मंडळात 99 तर कोपर्डे हवेली मंडळात 98 मिलिमीटर उच्चांकी पावसाची या हंगामात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. तालुक्यात बुधवारी रात्रीपासून सुरू मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्याचा जोर आज सकाळीही कायम होता. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी जात असून दळणवळण विस्कळीत होण्याची वेळ आली आहे दोन आठवड्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठी गैरसोय झाली आहे.

Satara Rain
सावधान! पुणे बंगळूर महामार्गाची वाहतुक संथ गतीने; काेयनेत जाेर

क-हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली मंडळात सर्वाधिक पाऊस झाला आहे. उंब्रज मंडळात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पाचवड फाट्यानजीक महामार्गावरील उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूच्या शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उर्वरित क्षेत्रावरील पेरणी रखडण्याची चिन्हे आहेत.

Satara Rain
काेट्यावधी रुपयांचा निधी वळविण्याचा 'जलसंपदा' चा घाट

कराड तालुक्यातील मंडल निहाय पावसाची आकडेवारी अशी :

कराड 95.00 मिलिमीटर, मलकापूर मंडल विभागात 93.00 मिलिमीटर, सैदापूर मंडल विभागात 90.00 मिलिमीटर, कोपर्डे हवेली मंडल विभागात 98.00 मिलिमीटर, मसुर मंडल विभागात 75.00 मिलिमीटर, उंब्रज मंडल विभागात 85.00 मिलीमीटर, शेणोली मंडल विभागात 88.00 मिलिमीटर, कवठे मंडल विभागात 82.00 मिलिमीटर.

Satara Rain
169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा

याबराेबरच काले मंडल विभागात 80.00 मिलिमीटर, कोळे मंडल विभागात 87.00 मिलिमीटर, उंडाळे मंडल विभागात 85.00 मिलिमीटर, सुपने मंडल विभागात 99.00 मिलिमीटर आणि इंदोली मंडल विभागाचा 88.00 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्व मंडल विभागात एकूण 1145.00 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 88.07 मिलीमीटर पाऊस झाला आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

Satara Rain
आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश
काेयना नदी
काेयना नदी

सातारा जिल्ह्यातील वडूज, गाेंदवले, खटाव, माण आदी भागात पाऊस पडत नसल्याने शेतक-यांनी शेतीच्या कामांना प्रारंभ केला आहे. सातारा, क-हाड, पाचगण, महाबळेश्वर शहरात पावसामुळे बाजारपेठ ठप्प झाली. फलटण शहरात पावसाचे वातावरण असून येथे पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. रहिमतपूर येथे पावसाने जाेर धरला आहे. कास, बामणोली परिसरात मुसळधार पाऊस पडत असून येथे पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी येऊ लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com