कृष्णा हॉस्पिटल 'कोविशिल्ड' लसीचे महत्त्वाचे केंद्र : डॉ. भोसले

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना काळात पश्चिम महाराष्ट्रासाठी आरोग्य संजीवनी ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या 'कोविशिल्ड' या लसीचे 550 डोस कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध झाले असून, पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.  भोसले यांच्या हस्ते झाले. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. विश्वास पाटील यांना पहिली लस देण्यात आली. याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशीकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा हॉस्पिटल हे कोरोनामुक्तीचे महत्वाचे केंद्र असून, आत्तापर्यंत याठिकाणी 3358 कोरोनाग्रस्त रूग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यापैकी ३२०० हून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटल हे 'कोविशिल्ड' या लसीसाठीच्या संशोधनासाठीचेही एक महत्वाचे केंद्र राहिले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले असून, लसीकरणानंतर लाभार्थ्याला 30 मिनिटे वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, त्यासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या 3000 जणांची नोंदणी करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज 100 जणांना लस दिली जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com