esakal | Corona : खटाव, क-हाडसह साता-यात रुग्णसंख्या वाढली 26 बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

खटाव, क-हाडसह साता-यात रुग्णसंख्या वाढली; 26 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 972 नागरिकांचे अहवाल कोरोना (coronavirus) बाधित आले आहेत. याबराेबरच 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोना बाधितांच्या (covid19 patients) संख्येचा आलेख कमी- जास्त होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण संख्या आठशे पर्यंत पाेचली हाेती. परंतु ही संख्या पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. यामुळे जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीट रेट ही कमी जास्त हाेत आहे. (satara-marathi-news-corona-update-972-patients-karad-jawali)

सातारा जिल्ह्यात आज 972 कोरोनाबाधित व 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 40 (8174), कराड 154 (25035), खंडाळा 67 (11341), खटाव 139 (18480), कोरेगांव 98 (15886), माण 53 (12498), महाबळेश्वर 15 (4197), पाटण 42 (7813), फलटण 80 (27664), सातारा 224 (38411), वाई 46 (12219) व इतर 14 (1210) असे आज अखेर एकूण 182928 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

हेही वाचा: सावधान! डेंगीचा प्रादुर्भाव वाढला; विलासपूरकर आंदाेलन छेडणार

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 7 (737), खंडाळा 0 (146), खटाव 2 (457), कोरेगांव 3 (365), माण 2(247), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (176), फलटण 1 (274), सातारा 7 (1167), वाई 2(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4120 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

covid 19

covid 19

हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे

काही सुखद बातम्या वाचा

loading image