esakal | सावधान! डेंगीचा प्रादुर्भाव वाढला; विलासपूरकर आंदाेलन छेडणार
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

सावधान! डेंगीचा प्रादुर्भाव वाढला; विलासपूरकर आंदाेलन छेडणार

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत (satara muncipal council) नव्याने समाविष्ट झालेल्या विलासपूरसह (vilaspur satara) इतर परिसरात डेंगीचा (dengue) प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात साथ सुरू असताना पालिकेने अद्यापही साफसफाई व औषध फवारणी केली नाही. येत्या चार दिवसांत विलासपूर परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरवात न केल्यास मुख्याधिकारी (chief officer) व आरोग्य अधिकाऱ्यांना (health department) घेराव घालणार असल्याचा इशारा विलासपूर परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (satara-marathi-news-dengue-in-vilaspur)

दीड वर्षापूर्वी विलासपूर ग्रामपंचायतीच्या १० एकरांचे कार्यक्षेत्र, तर सुमारे आठ हजार लोकसंख्येचा भाग पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला. या भागातील नागरिकांचा संपूर्ण महसूल पालिकेला मिळत आहे. तरीही विकासाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, औषध फवारणी करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, अद्यापही पालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. सध्या विलासपूर भागात १५ हून अधिक डेंगीचे रुग्ण असताना पालिकेचे आरोग्य अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची कामे अद्यापही सुरू झाली नसल्याने साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व पालिकाही दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक रहिवाशी विजय ननावरे यांनी सांगितले.

हेही वाचा: म्युकर मायकोसिसने ग्रासले सातारकर; 69 रुग्णांवर उपचार सुरु

भावी नगरसेवकांनो, रस्त्यावर उतरा....

पालिकेच्या हद्दीत आल्याने विलासपूरमधील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सातारा पालिकेच्या सभागृहात जाण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीला सहा महिने बाकी असताना काका, मामा, दादा, भाई अशा हाका मारत भावी नगरसेवक स्वतःचे बॅडिंग करून घेत आहेत. त्यांनी विलासपूरमधील नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेची स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी, तर नदी स्वच्छतेत पिछाडी!

विलासपूर परिसरात डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. पालिकेने या ठिकाणी लवकरात लवकर साफसफाई करून औषध फवारणी केल्यास इतर साथींच्या आजारांचा फैलाव रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

ब्लाॅग वाचा

loading image
go to top