esakal | पवारांचा कथित राजीनामा माझ्यापर्यंत आलाच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Muncipal Council Top Stories In Marathi News

पवारांचा कथित राजीनामा माझ्यापर्यंत आलाच नाही

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा नगरपालिकेच्‍या (satara muncipal) बांधकाम विभागाच्या सभापती सिद्धी पवार (siddhi pawar) यांनी आपल्या पदाचा देऊ केलेला कथित राजीनामा (resignation) अद्यापपर्यंत माझ्‍याकडे आलेला नसून तो आल्‍यावर त्‍यावर यथायोग्‍य प्रशासकीय कार्यवाही होणार असल्‍याची माहिती नगराध्‍यक्षा माधवी कदम (madhavi kadam) यांनी पत्रकाव्‍दारे दिली आहे. (satara-marathi-news-madhavi-kadam-siddhi-pawar-udayanraje-bhosale)

भुयारी गटार योजनेच्‍या कामावरून ठेकेदारासह पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना उद्देशून बांधकाम सभापती सिद्धी‍ पवार यांनी अर्वाच्‍च भाषा वापरत शिवीगाळ केली होती. याबाबतची क्‍लीप व्‍हायरल झाल्‍यानंतर त्‍याची गंभीर दखल घेत खासदार उदयनराजेंनी विकासकामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍या होत्‍या. याच अनुषंगाने सिद्धी पवार यांनी १६ मार्च रोजी लिहिलेला आपला राजीनामा १६ एप्रिलला खासदार उदयनराजेंना सोपवल्‍याची माहिती दिली होती.

हेही वाचा: 'उदयनराजेंच्या पराभवात तुमचा माेलाचा वाटा'

या राजीनामापत्रात पवार यांनी पालिकेच्‍या कारभारात हस्‍तक्षेप करणाऱ्यांवर तसेच नगराध्‍यक्षा माधवी कदम यांच्‍यावर टीका केली आहे. ही टीका करत असतानाच त्‍यांनी रविवारी पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना आपला राजीनामा देणार असल्‍याचे सांगितले होते. या अनुषंगाने नगराध्‍यक्षा माधवी कदम यांच्‍याकडे अनेकांनी चौकशी केली. चौकशीअंती त्‍यांनी सिध्‍दी पवार यांचा कथित राजीनामा आपल्‍याकडे आला नसल्‍याची प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: सातारा : वेळ आल्यावर व्याजासह हिशोब चुकता करीन; नगराध्यक्षांचे पवारांना प्रत्युत्तर

Satara Mayor Madhavi Kadam

Satara Mayor Madhavi Kadam

याच आशयाचे निवेदन कदम यांनी प्रसिध्‍दीस दिले आहे. यात त्‍यांनी पवार यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्‍याचे आजच मला वेगवेगळ्या माध्‍यमातून समजले. पवार यांचा कथित राजीनामा अद्यापपर्यंत माझ्‍याकडे प्राप्‍त झालेला नाही. पवार यांचा असा काही राजीनामा ज्‍यावेळी प्राप्‍त होईल, त्‍यावेळी यथायोग्‍य पुढील कार्यवाही करण्‍यात येईल, असे त्यात नमूद केले आहे.

काही सुखद बातम्या वाचा

loading image
go to top