क्रीडा संकुलासाठी पाच कोटी देईन; सुनील केदारांचे आश्वासन

Suil Kedar
Suil Kedarsystem

वडूज (जि. सातारा) : येथील तालुका क्रीडा संकुलासाठी (taluka sports complex) पाच कोटी रुपयांचा निधी व तालुका लघु पशु चिकित्सालयासाठी पशु वैद्यकीय अधिकारी व अद्ययावत सुविधा देण्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार (sunil kedar) यांनी दिली. (satara-marathi-news-sunil-kedar-assures-five-crore-for-vaduj-sports-complex)

मंत्री केदार यांनी गुरुवारी (ता.3) येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सहकारी सूतगिरणीस भेट दिली. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, तालुका क्रीडा महासंघाचे क्रीडाशिक्षक राजेंद्र पवार, प्रा. प्रमोद राऊत, जे. बी. घार्गे, इम्रान बागवान आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री केदार यांना श्री. देशमुख यांनी तालुका क्रीडा संकुल व तालुका लघु पशु चिकित्सालयाच्या समस्यांबाबत माहिती दिली.

Suil Kedar
'आमचा सचिन सुखरूप येईल असे वाटत हाेते'; गावकरी शाेकसागरात

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार,1998 रोजी येथे राज्यातील पहिले तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. त्यावेळी देखील मंत्री केदार यांच्याकडे क्रीडा मंत्रिपद होते. त्यावेळी त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. सद्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, कार्यालय, 400 मीटरचा धावणे मार्ग तसेच संरक्षक भिंतीचे काही काम झाले असून, उर्वरित कामांसाठी चार ते पाच कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. क्रीडा संकुलासाठी संरक्षक भिंतीचे काम प्राधान्याने होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागांत तयार होणाऱ्या कुस्तीगिरांसाठी महाराष्ट्र राज्य संयोजित खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा येथील क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागल्यास येथे स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल.

Sports Minister Sunil Kedar along with sports teacher rajendra pawar
Sports Minister Sunil Kedar along with sports teacher rajendra pawar
Suil Kedar
उस्मानाबादी-सानेन जातीच्या शेळ्या शेतकऱ्यांना देणार; पशुसंवर्धन मंत्र्यांचं आश्वासन

तालुका लघु पशु चिकित्सालय हे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पशुधनावर उपचारासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. याठिकाणी सहायक आयुक्तपद रिक्त आहे. शिवाय काही अद्ययावत सोयी-सुविधा मिळणे गरजेचे असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

त्यावेळी मंत्री केदार यांनी तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी व तालुका लघु पशु चिकित्सालयासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व अद्ययावत सुविधा देण्याची ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com