

A massive explosion at a chemical factory in Tasawade MIDC, Satara, caused a large fire and shockwaves felt up to 10 km, leading to widespread panic and damage to nearby buildings.
esakal
Satara Chemical Factory Explosion : साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. यानंतर भीषण आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की, १० किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.