
sakal
सातारा : जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडती झाल्या. यामध्ये नव्या प्रभागरचनेत बंद झालेली दारे या सोडतीत पुन्हा खुली झाली आहेत. काही इच्छुकांना पर्यायी मार्ग काढावा लागणार आहे. काही दिग्गजांना दुसऱ्या प्रभागाची चाचपणी करावी लागणार आहे. आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत नऊ ते १४ ऑक्टोबरपर्यंत आहे.