esakal | घाबरु नका! साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

साताऱ्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.

घाबरु नका! साताऱ्यात तालुकानिहाय 30 बेडचे कोरोना सेंटर; आरोग्य विभागाकडून सतर्कता

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मागील चार दिवसांपासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रत्येक तालुक्‍यात 30 बेडची कोरोना केअर सेंटर (सीसीसी) उघडण्यात आली आहेत. त्यामुळे या सेंटरमध्ये असणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही पुढील एक वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सेंटरची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

मार्च ते सप्टेंबर या महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून उपचारासाठी सुविधा दिल्या जातात. या सेंटरसाठी आरोग्य विभागात असलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक सेंटरसाठी एक वैद्यकीय अधिकारी, सहा स्टास नर्स, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा ऑपरेटर, कक्ष सेवक अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा सीसीसी सुरू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता भासू लागल्याने 68 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे. 

दुधेबावीत भवानीआई डोंगरात वणव्याचा भडका; वन विभागाने लावलेली अनेक झाडे जळून खाक

मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यानंतर ऑक्‍टोबर ते जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. सद्य:स्थितीत प्रत्येक तालुक्‍यात एक सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर हॉटस्पॉटच्या ठिकाणी कोरोना सेंटर वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली आहे. 

How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड

सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर 

साताऱ्यात प्रामाणिकतेचे दर्शन! सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image