esakal | काळ आला होता, पण वेळ नाही! वडाचीवाडीत लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांतून बचावली अपघातग्रस्त बैलगाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सातारा-लातूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. छोटे-मोठे पूल वगळता सर्व कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.

काळ आला होता, पण वेळ नाही! वडाचीवाडीत लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांतून बचावली अपघातग्रस्त बैलगाडी

sakal_logo
By
पांडुरंग बर्गे

कोरेगाव (जि. सातारा) : सातारा-लातूर महामार्गानजीक वडाचीवाडी (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीत उसाची वाहतूक करणारी बैलगाडी रस्त्याकडेला खड्ड्यात कोसळल्यामुळे बैल जखमी झाला. त्यात गाडीचे नुकसान झाले. गाडीचालक सुखरूप बचावला. मात्र, ही बैलगाडी कोसळताना फूट-दोन फूट अंतरावर असलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श झाला नाही, अन्यथा बैलगाडीचालकासह बैल विजेचा धक्का बसून जळून खाक झाले असते. काळ आला होता. मात्र, वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय यानिमित्ताने आला. 

सातारा-लातूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. छोटे-मोठे पूल वगळता सर्व कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. हे काम सुरू असताना वडाचीवाडी हद्दीत रस्त्याची उंची वाढलेली आहे. त्यामुळे रस्त्याकडेच्या वीज वाहिन्या अगदी हाताच्या अंतरावर खाली आलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहिन्यांचा धक्का लागून गंभीर अपघात होऊ शकतो. याबाबत या परिसरातील काही शिवाजी तुकाराम चव्हाण व इतर रहिवाशी ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या कोरेगाव कार्यालयात लेखी व तोंडी स्वरूपात या वीज वाहिन्यांची उंची वाढवावी, गंभीर अपघात होऊ शकतो, अशी वारंवार विनंती केली होती. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, त्याकडे रस्त्याचे काम पूर्णत्वास आले तरी दुर्लक्ष केलेले आहे. कोणीही गांभीर्याने याकडे पाहिलेले नाही. नाही म्हणायला "महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनी वीज वाहिन्यांना कळकांचा आधार देऊन तात्पुरती उपाययोजना केलेली आहे. परंतु, हे कळक वाऱ्याने व वाहनांच्या धक्‍क्‍याने सतत पडतात. मग, परिसरातील ग्रामस्थ धोका पत्करून कळक पुन्हा उभे करतात. मात्र, महावितरण कंपनीने काही ठोस उपाययोजना केली नाही. परिणामी स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

दरम्यान, आज सकाळी जरंडेश्‍वर साखर कारखान्याकडे ऊस वाहून नेणारी एक बैलगाडी अनावधानाने जिथे विजेच्या वाहिन्या खाली आलेल्या आहेत, त्या ठिकाणी रस्त्यावरून खाली घसरून पडली. बैलगाडी खाली पडताना विजेच्या वाहिन्यांना आधार म्हणून लावलेला कळकही पडला. त्यामुळे वाहिन्या खाली आल्या. मात्र, तोवर बैलगाडी खाली खड्ड्यात गेलेली होती. त्यामुळे विजेचा कोणालाही धक्का बसला नाही. सुदैवाने बैल आणि गाडीचालक बचावला. मात्र, एक बैल जखमी झाला आहे. काळ आला होता. मात्र, वेळ आली नव्हती, या म्हणीचा यावेळी प्रत्यय आला. मात्र, या घटनेमुळे "महावितरण'च्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाबाबत परिसरातील नागरिक प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसत होते. 

How’s The Josh : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेढ्यातल्या दोन भावांची भारतीय नौदलात निवड

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image