esakal | पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा; महिला जिल्हाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

काही समाजकंटक समाजात जातीय दंगा अथवा कायदा व सुव्यवस्था कशी विस्कळित होईल, यादृष्टीने प्रयत्न करतात.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा; महिला जिल्हाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा : होळीच्या दिवशी नांदेडमध्ये निघालेल्या शीख समुदायाच्या रॅलीला अटकाव केल्याने पोलिसांवर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर व महिला युवा जिल्हाध्यक्षा प्रियांका तोरस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

काही समाजकंटक समाजात जातीय दंगा अथवा कायदा व सुव्यवस्था कशी विस्कळित होईल, यादृष्टीने प्रयत्न करतात. नागरिकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य पोलिस बजावत असतात. त्या पोलिसांवर हल्ला होणे निश्‍चितच राष्ट्रासाठी धोकादायक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष संदीप माने, अभिषेक शिंदे, अविनाश मेळावणे, प्रणाली डाळवाले, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष नितीन मालुसरे उपस्थित होते. 

व्यापा-यांमुळे काेराेना हाेताे का? आम्ही दुकान सुरु ठेवणारच!

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे 

वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image