सातारा, सांगली जिल्ह्यात पुनर्वसन करुनही मराठवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचेही दुर्लक्ष

राजेश पाटील
Monday, 21 December 2020

मराठवाडी धरणामध्ये विस्थापित होणाऱ्या विविध गावांचे सातारा व सांगली जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचे काम 23 वर्षांपासून सुरू आहे. त्यापैकी घोटील गावचे पुनर्वसन ताईगडेवाडी (तळमावले) येथील गावठाणात होत असून, कुंभारगाव रस्त्यालगत सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यासाठी गावठाणही विकसित केलेले आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांसाठी विकसित केलेल्या ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील गावठाणात सुमारे 15 वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट कॉंक्रिटची अंतर्गत गटारे आता वापरात येण्यापूर्वीच मुजली आहेत. अनेक ठिकाणी गटारे तुटल्याने त्यावरील खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. 

मराठवाडी धरणामध्ये विस्थापित होणाऱ्या विविध गावांचे सातारा व सांगली जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचे काम 23 वर्षांपासून सुरू आहे. त्यापैकी घोटील गावचे पुनर्वसन ताईगडेवाडी (तळमावले) येथील गावठाणात होत असून, कुंभारगाव रस्त्यालगत सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यासाठी गावठाणही विकसित केलेले आहे. त्यावेळी गावठाणात केलेली काही नागरी सुविधांची कामे आता तेथे धरणग्रस्त घरबांधणी करून प्रत्यक्ष राहण्यास येण्याच्या वेळेलाच नूतनीकरणास आली असून, काही सुविधांची तर दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. 

UK ची विमान सेवा तात्काळ थांबवा : पृथ्वीराज चव्हाण

गावठाणातील अंतर्गत गटारांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मोठा खर्च करून सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधलेली गटारे तुटली असून, अनेक ठिकाणी ती मुजली आहेत. पावसाळ्यात डोंगरउताराने वाहणाऱ्या पाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला आहे. सध्या कृष्णा खोरेने गावठाणात गटारे नसलेल्या ठिकाणी नवीन गटारे बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, ते आवश्‍यकही आहे. परंतु, पूर्वीच्या मोडतोड झालेल्या व मुजलेल्या गटारांचे काय करायचे? हा प्रश्न मात्र निरुत्तरितच राहिला आहे. लवकरच कुंभारगाव-तळमावले मार्गाला जोडणाऱ्या गावठाणातील रस्त्याचे डांबरीकरण सुरू होणार असले तरी अंतर्गत रस्त्यांची दैना झाल्याने धरणग्रस्त कुटुंबे संताप व्यक्त करत आहेत. 

Video : आश्‍चर्य..! सूर्याचीवाडीत चक्क पट्टेरी हंस; फ्लेमिंगोचे आगमन लांबले

सुविधांनी सुसज्ज पुनर्वसित गावठाण जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी कृष्णा खोरेचीच आहे. ती टाळण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उभारावा लागेल.'' 

-जितेंद्र पाटील, मुख्य संघटक, जनजागर प्रतिष्ठान 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Demand For Providing Facilities To The Citizens Of Marathwadi Dam